Breaking News

शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी
पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली.
यावर देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे.
वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले.
शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण उपस्थित होते.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *