Breaking News

दानवे-जाधव, राजकारणामुळे कौटुंबिक सौख्य हरविलेल्या घराण्यात आणखी एकाची वाढ राज्यातील प्रतिष्ठित राजकिय घराण्यांमध्ये सारेच काही आलबेल नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात अनेक तालेवार राजकारण्यांची घराणी आहेत. त्यापैकी काही सुसंस्कृत तर काही इरसाल घराणी म्हणून ओळखली जातात. मात्र राजकिय महत्वकांक्षेने कुटुंबात वाद निर्माण झाला आणि त्याची परिणती राजकिय तर कधी वैयक्तिक स्तरावर झाल्याचे चित्र आपल्याला काही ठिकाणी पाह्यला मिळाली. त्यात आता रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या राजकिय घराण्याचा समावेश करावा लागेल. मात्र तो वेगळ्या पध्दतीने.
मागील साधारणत: १५ वर्षात एकाच राजकिय कुटुंबामध्ये राजकिय महत्वकांक्षेने अंतर्गत कलह वाढून कौटुंबिक सौख्य हरविण्याची पाळी काही घराण्यांवर आली. त्यातील सर्वाधिक पहिले कुटुंब म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांच्या कुटुंबाचा उल्लेख करावा लागेल. या घराण्याचे कर्ते पुरूष म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे स्व.शंकरराव मोहिते-पाटील यांच्यानंतर बघितले जाते. त्यांच्यानंतर या सात भावंडामध्ये सत्तेच्या राजकारणाची वाटणी झाल्याचे नेहमीच सांगण्यात येते. मात्र मध्यंतरीच्या काळात विजयसिंह मोहिते-पाटील यांचे धाकटे बंधू आणि त्यांच्या आमदारकीवरून बेबनाव झाल्याची चर्चा नेहमीच सोलापूर जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर रंगली.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हयायतीतही शिवसेनेची जबाबदारी कोणावर उध्दव ठाकरे कि राज ठाकरे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावर तोडगा काढत शिवसेनेचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्या हाती सोपवित या प्रश्नावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मराठवाड्यातील मुंडे घराणे, भाजपा नेते स्व.गोपीनाथ मुंडे हे हयात असताना त्यांचे स्थानिक पातळीवरील राजकारण त्यांचे थोरले बंधु पंडीत अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहात असत. त्यामुळे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा जिल्ह्यातील खडानखडा माहिती या दोघांकडे असायची आणि स्थानिक पातळीवरचे राजकारणही हेच दोघे संभाळायचे. त्यामुळे गोपीनाथरावांचे राजकिय वारस म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बीडमधली जनता बघत होती. परंतु कालांतराने माझं झाले आता माझ्या पोटाच्या पोरांचे काय या प्रश्ननुसार धनंजय मुंडे यांच्याकडील स्थानिक पातळीवरचे नेतृत्व हळहळू पंकजा मुंडे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यांना आमदारकीचे तिकिट दिले. त्यामुळे मुंडे कुंटुंबात पहिल्यांच राजकिय महत्वकाक्षेच्या कारणाने कौटुंबिक सौख्यात मीठ कालविण्यास सुरुवात केली. त्यानंतरचा इतिहास आणि वर्तमान सर्वश्रुतच आहे.
साधारत: ६ महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात आदरणीय घराणं म्हणून पाहिलं जाते ते पवार कुटुंब. गेली अनेक वर्षे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकिय मतभेद मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नियंत्रण कोणाचे यावरूनही काका-पुतण्यात कुरघोडीचे राजकारण खेळले जात असल्याची चर्चा नेहमीच सुरु असते. मात्र सहा महिन्यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु असताना ऐनवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपाशी हातमिळविणी करून औटघटकेचे सरकार स्थापन केले.
त्यानंतर पुन्हा ते स्वगृही परतलेही परंतु या काका-पुतण्यामध्ये नेमके काय घडल याची साधी चर्चाही कोठे जाहीर झाली नाही कि त्याची वाच्यता झाली नाही.
मात्र या चार घराण्यात नेमका कशावरून बेबनाव झाला, त्याची कारणे काय किंवा आरोप-प्रत्योरोपाच्या जाहीर फैरी कधीच झडल्या नाहीत. मात्र रावसाहेब दानवे हे भाजपाचे नेते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहीलेले आणि केंद्रात मंत्री आहेत. त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे राजकिय स्टंटबाजीसाठी प्रसिध्द आहेत. तरीही त्यांच्यातील कौटुंबिक संबध इतक्यास्तरावर ताणले गेले असतील याची साधी कल्पनाही कोणालाही नव्हती. मात्र आता जाधव यांनीच दानवे हे आपल्याला धमक्या देत आहेत, त्यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. यावरून परिस्थिती फारच चिघळल्याचे दिसून येत असली तरी राजकिय स्पर्शाने सौख्य हरविलेल्या राजकिय घराण्यांच्या यादीत आणखी एक नाव वाढल्याचे दिसून येते.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *