Breaking News

पोलिस सायबरमध्ये इंटर्नशीप करायचीय मग या ईमेल वर बायोडेटा पाठवा महाराष्ट्र सायबर विभागाकडून अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सायबर विभाग पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.[email protected]  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे १२-८-२०२० पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center,

Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियमअटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

इंटर्नशीपचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही.  (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)

महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.

महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.

महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.

कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत.

असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *