Breaking News

कोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली

मुंबई: प्रतिनिधी

युरोपमधील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातही दिवाळीच्या सणानंतर साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने अर्थात आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्या रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी महानगरपालिकांना पूर्व तयारीच्या अनुषगांने नवे आदेश दिले आहेत.

या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत एक आराखडा तयार करण्यात आला असून त्या आराखड्यानुसार सर्व गोष्टींची पुर्तता करण्याचे आदेश आरोग्य विभागांने सर्वांना दिले आहेत. या आदेशानुसार जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली असून शासकिय रूग्णालयात किंवा महानगरपालिका रूग्णालयातील प्रयोगशाळा यापुढेही सुरु ठेवण्यात आलेल्या सर्व प्रयोगशाळा कायम सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार १० लाख नागरिकांमागे किमान १४० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात यावेत असे बजावण्यात आले आहेत. तसेच या प्रयोगशाळा सुरु असल्याबाबतची माहिती जनतेला करून द्यावी असे निर्देशही जिल्हा आरोग्य प्रशासनास दिले.

तसेच सतर्कतेचा इशारा म्हणून फ्ल्यु सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण करावे शहरी आणि ग्रामीण भागात फिवर क्लिनिक कायम सुरु ठेवून या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले आहेत. त्याच या रूग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन करून आजाराचा ट्रेंड समजून घ्यावे. त्या त्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर व सर्वेक्षण युध्द पातळीवर भर द्यावा असे आदेशही देण्यात आले आहे.

यांची प्रयोगशाळा चाचणी करा-

याशिवाय जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात यावा अशी सूचना करत व्यवसायाच्या निमित्ताने जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क असतो अशा व्यक्तींकडून कोरोनाचा प्रसार न कळत होवू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची प्रयोगशाळा चाचणी प्राधान्याने करावी असे बजावण्यात आले आहे. जनसंपर्क करणाऱ्यांच्या यादी छोटे दुकानदार व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे- यामध्ये घरोघरी पेपर टाकणारे, दूध पुरवठा करणारे, घरकाम करणाऱ्या महिला कामगार, नोकर, गॅस सिलेंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रीक विषयक-नळ जोडणी दुरूस्ती करणारे कर्मचारी, लॉण्ड्री, इस्त्री करणारे, पुरोहित, वाहतूक व्यवसायातील लोक, हमाली-रंगकाम-बांधकाम करणारे मजूर, एसटी बसेस, महापालिकांच्या बसेसमधील कंडक्टर-ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, पोलिस-होमगार्ड, या सर्वांची प्रयोगशाळा चाचणी करून कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांची प्रयोगशाळा चाचणी करण्यावर भर द्यावा.

रूग्णोपचार व्यवस्था-

प्रत्येक जिल्ह्यात रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड उपचाराची जबाबदारी जिल्हा व शहरातील विशिष्ट रूग्णालयांवर सोपवावी.

सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आता कोविड रूग्णालय म्हणून ठेवण्याची गरज नाही.

तसेच जिल्हा आणि शासकिय वैद्यकिय रूग्णालयात कोविडबरोबरच नॉन कोविड रूग्णांवर उपचार सुरु करावेत.

प्रत्येक तालुक्यात विशिष्ट कोविड निगा केंद्र, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड रूग्णालय निश्चित करण्यात यावेत. तसेच रूग्णवाहिकाही निश्चित करण्यात यावी.

गरजेनुसार कोविडसाठी जास्तीच्या खाटा उपलब्ध करून द्याव्यात.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातील टास्क फोर्सने स्थानिक परिस्थितीचा यथायोग्य आढावा घेवून निर्णय घेण्यास सांगण्यात आले.

याशिवाय अन्य महत्वाची माहिती सोबत जोडलेल्या शासनाच्याच आदेशात वाचा.

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *