Breaking News

डिझेल महागले, पेट्रोलचा दर स्थिर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होवूनही दर स्थिर

मुंबई: प्रतिनिधी

पेट्रोलियम कंपन्यांनी १८ दिवस इंधन दरवाढ स्थिर ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा भाव वाढवले आहेत. शुक्रवारमध्ये डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही.  पेट्रोलचा भाव सलग १९ व्या दिवशी स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. मात्र, देशात पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १८ दिवस इंधनांचे दर स्थिर ठेवले. मात्र, आता डिझेल महाग करण्यात आले. दिल्लीत पेट्रोलचा भाव १०१.१९ रुपये आहे. तर डीझेलचा दर ८८.८२ रुपयांवर गेला आहे. दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.४१ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव चेन्नईत ९३.६६ रुपये, कोलकात्यात ९१.७२ रुपये, भोपाळमध्ये ९७.६५ रुपये, बंगळुरात ९४.२७ रुपये झाला आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. अमेरिकेत गुरुवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव ७७.२५ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात १.०६ डॉलरची वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७३.३० डॉलर झाला. त्यात १.०७ डॉलरची वाढ झाली. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, पंजाब, मणिपूर, ओरिसा, चंदीगड, तमिळनाडू आणि लडाख या राज्यात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत.

Check Also

फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *