Breaking News

कोरोना : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर मंडळात कहर; २४ तासात २३ हजारापार २३ हजार १७९ नवे बाधित, ९ हजार १३८ बरे तर ८४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल १७ हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात आज एकदम ६ हजाराने वाढ होत तब्बल २३ हजार १७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत २३७७ सह ठाणे मंडळात ४ हजार ८११, नाशिक मंडळात ४ हजार १७, पुणे मंडळात ५ हजार २६८, नागपूर मंडळात ४ हजार १४५ इतके बाधित आढळून आल्याने या चारही मंडळात कोरोनाने चांगलाच कहर केल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे नागरीकांनी आता गंभीर होवून राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार त्रिसुत्री वापरण्यावर भर द्यावा अशी विनंती मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्यावतीने सर्वच वाचकांना करण्यात येत आहे.

आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख ६३ हजार ३९१  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) १.२६ % एवढे झाले आहे. तर मागील २४ तासात राज्यात २३,१७९  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

त्याचबरोबर राज्यात आज ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगत बाधित रूग्ण आढळून येण्याच्या तुलनेत राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २,३७७ ३,४९,९७४ ११,५५१
ठाणे २३७ ४५,३३० १,००७
ठाणे मनपा ५१६ ६७,३६७ १,२५४
नवी मुंबई मनपा ३६७ ६२,९६७ १,१६५
कल्याण डोंबवली मनपा ६३७ ७२,३२६ १,०८५
उल्हासनगर मनपा ६४ १२,३७५ ३६४
भिवंडी निजामपूर मनपा २४ ७,१६७ ३४२
मीरा भाईंदर मनपा १०७ २९,९१४ ६७०
पालघर ४१ १७,६४७ ३२१
१० वसईविरार मनपा ७४ ३२,५१७ ६१८
११ रायगड १३४ ३९,२८७ ९९८
१२ पनवेल मनपा २३३ ३४,५१८ ६२०
ठाणे मंडळ एकूण ४,८११ ७,७१,३८९ २१ १९,९९५
१३ नाशिक ५१८ ४२,६२२ ८३२
१४ नाशिक मनपा १,४९० ९३,२७७ १,१०३
१५ मालेगाव मनपा ११८ ६,०४७ १७१
१६ अहमदनगर ४३८ ५२,७७० ७५५
१७ अहमदनगर मनपा १६४ २८,७२४ ४२४
१८ धुळे १६७ ९,९९१ १८९
१९ धुळे मनपा १७० ९,८३५ १५०
२० जळगाव ३८४ ५२,४२२ १,१९७
२१ जळगाव मनपा १८६ १९,०१५ ३४८
२२ नंदूरबार ३८२ १२,४८७ २३०
नाशिक मंडळ एकूण ४,०१७ ३,२७,१९० १२ ५,३९९
२३ पुणे ९०६ १,०६,३२९ २,१७६
२४ पुणे मनपा २,६१२ २,३०,७९२ ४,६३६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १,२०६ १,१२,९२२ १,३४६
२६ सोलापूर १२२ ४५,६६६ १,२३७
२७ सोलापूर मनपा ११९ १४,७६८ ६३१
२८ सातारा ३०३ ६१,३०९ १,८६१
पुणे मंडळ एकूण ५,२६८ ५,७१,७८६ ११,८८७
२९ कोल्हापूर ३० ३५,१०२ १,२६०
३० कोल्हापूर मनपा १९ १५,१६२ ४२४
३१ सांगली ७२ ३३,६१३ १,१६५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४६ १८,४५२ ६३६
३३ सिंधुदुर्ग १८ ६,८१८ १८१
३४ रत्नागिरी १२,४६१ ४२६
कोल्हापूर मंडळ एकूण १९३ १,२१,६०८ ४,०९२
३५ औरंगाबाद १६६ १७,४५१ ३५१
३६ औरंगाबाद मनपा ९७९ ४४,९०० ९६०
३७ जालना १९० १७,३२८ ४०१
३८ हिंगोली ७४ ५,५६० १००
३९ परभणी ६८ ५,२२९ १७२
४० परभणी मनपा १२४ ४,५८५ १४३
औरंगाबाद मंडळ एकूण १,६०१ ९५,०५३ १२ २,१२७
४१ लातूर ६९ २२,७९८ ४८३
४२ लातूर मनपा ११८ ४,६५३ २३५
४३ उस्मानाबाद १०६ १८,७८२ ५७८
४४ बीड २६५ २१,५९० ५८३
४५ नांदेड २२४ १०,५८९ ३९६
४६ नांदेड मनपा २६२ १७,०५० ३०१
लातूर मंडळ एकूण १,०४४ ९५,४६२ २,५७६
४७ अकोला ११३ ७,९७३ १४८
४८ अकोला मनपा ३४२ १३,३३८ २५९
४९ अमरावती २४८ १४,७६४ २५१
५० अमरावती मनपा २२१ २९,७४२ ३३५
५१ यवतमाळ ३६३ २३,०६२ ५०७
५२ बुलढाणा ५३२ २२,१८१ २७१
५३ वाशिम २८१ १२,०३५ १७०
अकोला मंडळ एकूण २,१०० १,२३,०९५ १,९४१
५४ नागपूर ७०७ २५,३९० ८१८
५५ नागपूर मनपा २,६९८ १,५६,६३१ १२ २,७९५
५६ वर्धा ३६० १७,०६७ ३३८
५७ भंडारा १४४ १४,९०३ ३१५
५८ गोंदिया ३९ १४,९९५ १७५
५९ चंद्रपूर ६३ १६,३८६ २५७
६० चंद्रपूर मनपा ८७ ९,९७१ १६७
६१ गडचिरोली ४७ ९,४३५ १०६
नागपूर एकूण ४,१४५ २,६४,७७८ २२ ४,९७१
इतर राज्ये /देश १४६ ९२
एकूण २३,१७९ २३,७०,५०७ ८४ ५३,०८०

आज नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे- ७, नशिक-३, गडचिरोली- २, नागपूर- १ आणि नांदेड- १ असे आहेत.

 

Check Also

म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *