Breaking News

आजी काळजी करू नका… दोन तीन दिवसात बर्‍या व्हाल; ९० वर्षांच्या आजीला दिला धीर कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांची केली विचारपूस

सांगली: प्रतिनिधी

“आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन – तीन दिवसात बर्‍या व्हाल…” असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला आज भेट दिली.

यावेळी त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक व शाब्दिक आधार दिला.

दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसह बैठकही घेतली व रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावर मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *