Breaking News

ठाणे शहरात कोरोनाग्रस्तांसाठी रूग्णालय- बेड हवय, मग एक क्लीक करा महापालिकेचे खास संकेतस्थळ कार्यान्वित

ठाणे: प्रतिनिधी
ठाणे शहरामध्ये कोव्हीड 19 रूग्णांना महानगरपालिका जास्तीत सुविधा देत असतानाच आता दुसऱ्या बाजूला कोव्हीड बाधितांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरामधील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांची अद्ययावत माहिती रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळावी यासाठी www.covidbedthane.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आले आहे.
शहरातील कोव्हीड रूग्णालयांमधील खाटांचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण करता यावे यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये युद्धपातळीवर ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
ठाणे शहरामध्ये कोणती रूग्णालये कोव्हीड रूग्णालये आहेत, त्याची एकूण क्षमता काय आहे, तिथे रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाटांची उपलब्धता आहे किंवा नाही याची ऑनलाईन माहिती ठाणेकर नागरिकांना मिळावी यासाठी विशेष संकेतस्थळ निर्माण करण्याच्या सुचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
या संकेतस्थळावर रूग्णालयाचे नाव, ते रूग्णालय लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी की लक्षणे नसलेल्या रूग्णांकरिता आहे, त्या रूग्णालयामधील एकूण खाटांची क्षमता, सद्यस्थितीत रूग्णांनी व्याप्त खाटांची संख्या आणि उपलब्ध खाटांची संख्या याची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्या रूग्णालयामध्ये आयसीयू युनिटस् आहेत, त्याची क्षमता किती आहे आणि सद्यस्थितीत त्या आयसीयू युनिटमध्ये किती खाटा उपलब्ध आहेत याचीही अद्ययावत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे त्या त्या रूग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी रूग्णालयांचा संपर्क क्रमांकही देण्यात आलेला आहे. त्यामुळे रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रूग्णालयांच्या खाटांसाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही.
यामध्ये जे रूग्ण कोव्हीड बाधित आहेत पण त्यांना कोणतीही लक्षणे नाही अशा रूग्णासांठी कुठे व्यवस्था करण्यात आली आहे याचीही माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळामुळे कोव्हीड 19 रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *