Breaking News

खा. सुप्रिया सुळे म्हणतायत, “लाईफ इज ब्युटीफुल” पण “बदलावं लागणार” फेसबुकवरुन जनतेशी साधला संवाद

मुंबई: प्रतिनिधी
आता १४-१५ दिवस शिल्लक राहिले आहेत. सुरक्षित राहुया कारण ‘लाईफ इज ब्युटीफुल’ छोट्या – छोट्या गोष्टी आता महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. कदाचित म्हणूनच नियतीच्या मनात काहीतरी असेल म्हणून तिने आपल्याला थोडंसं ‘चेक्स इज बॅलन्सस’ मध्ये जगायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते. मी अनुभवातून शिकते. मी माझ्या आयुष्यात बदल करणार आहे असे सांगतानाच या संकटावर मात केल्यावर दैनंदिन आयुष्यात बदल नक्की करु आणि या कोरोनाच्या विरोधातील जो लढा आहे तो आपण सगळे मिळून नक्की जिंकू असा ठाम आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत भविष्यकालाबद्दल आश्वासक चित्र निर्माण केलं.
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीच शिवाय आलेल्या टिकेलाही तितक्याच नम्रपणे सामोऱ्या गेल्या.
स्वतः ला बोअर करून घेवू नका. लॉकडाऊन संपल्यावर काय काय करु शकतो यावर विचार करायची गरज आहे. महाराष्ट्रात कुणीही थुंकता कामा नये. सोशल डिस्टनसिंग पाळावी, हात धुवावेत या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्या आपल्या आईवडीलांनी, आजीआजोबांनी आयुष्यभर आपल्याला सांगितल्या आहेत. त्या जर आपण पाळल्या, गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की करु नये या सगळ्या गोष्टी नवीन लाईफस्टाईल मध्ये अर्थात ‘पोस्ट कोरोना इरा’ मध्ये पुन्हा कराव्या लागणार असल्या तरी हा वेगळा इरा राहणार आहे. कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. लाईफस्टाईल बदलाव्या लागणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा वापर म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष्यात बदल करावे लागणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
आता आम्ही कुठलाही पक्ष पहात नाहीय तर फक्त माणुसकी पहाणं गरजेचं आहे असं वैयक्तिक मत मांडतानाच माणुसकीच्या नात्याने आम्ही आमचे सगळे प्रयत्न करत आहोत. तुम्हीही सहकार्य करत आहात. घरात ३०-३५ दिवस राहणं सोपं नाही आपण सगळे अडचणीवर मात करतोय. त्यामुळे हा प्रश्न सुटल्यावर नक्की चांगलं घडेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या काळात आम्हाला राजकारण करायचं नाहीय, तर समाजकारण करायचं आहे. मोदीसाहेबांच्या सरकारच्या सूचनांचे पालन करून हातात हात घालून राज्य सरकार २४ तास दिलेल्या सूचना असतील किंवा आम्ही केलेल्या सूचना असतील त्याचे पालन करण्याचे काम करत आहोत. यानुसार अतिथी देवो भव म्हणत आपल्यासाठी आपल्या राज्यात येवून काम करणारे प्रत्येकजण महाराष्ट्राच्या जडणघडणीत तयार झालेले मजुर असो किंवा अन्य कुणी त्यांचा मानसन्मान केला जात आहे. त्याला अन्नधान्याची मदत केली जात आहे. माझ्या महाराष्ट्रात कुणालाही उपाशीपोटी राहू देणार नसल्याचा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेले ३० दिवस मतदार संघात इच्छा असूनही जायला मिळत नाहीय. माझ्या आयुष्यात खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं आहे. मात्र तरीही झूम कॉल, लॅण्डलाईनवरून २४ तास देशात, राज्यात आणि मतदारसंघात जनतेशी, संघटनेतील लोकांशी संपर्कात आहे. अन्नधान्याची अडचण येत आहे. त्यासाठी पवार साहेब देशाचे अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी सातत्याने संपर्क करत आहेत. शिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही अन्न धान्य कमी पडू नये म्हणून सतत काम करत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. अधिकारी वर्गाशी संपर्क करत आहेत. त्यातूनही टिका होत आहे. मात्र एक आपल्या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी राहणार नाही असा शब्द देतानाच ही राजकारण करायची वेळ नाही टिका करा पण ही वेळ ती नसल्याचा आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली.

Check Also

१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *