Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर शहरात काल ९० आज ६७, तर ग्रामीण भागातील संख्या १४८ वर

सोलापूर : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद  झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका रूग्णाचे निदान झाले असून ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या १४९ वर गेली आहे. तर मृतकांची संख्या ११ वर पोहोचली. ग्रामीण भागात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक रूग्ण दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक ६८, तर अक्कलकोट, बार्शी या तालुक्यात प्रत्येकी २२ तर उत्तर सोलापूरमध्ये ११ रूग्णांची नोंद झाली आहे.

शहरात १०२४ रूग्ण आतापर्यत बरे होवून घरी गेले आहेत. तर ७०६ रूग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात ६९ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *