Breaking News

खुषखबर ! पुण्यात होणार पहिल्यांदा ३० माकडांवर कोरोना लसची चाचणी माकड राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपूर्द-वनमंत्री संजय राठोड

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड – 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल. यासाठी ३० माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे.त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध

देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *