Breaking News

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून कारभार हाकण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यातच हे संकट आणखी वर्षभर तरी हटणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी जाहीरात देणे, त्यांच्या परिक्षा मुलाखती आणि नियुक्त्या करणे अशक्य होणार आहे. तसेच या प्रक्रिया पूर्ण करताना कोरोनाची लागण किती जणांना होईल याचा अंदाज अद्याप तरी व्यक्त करता येत नाही. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांनाच १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० वर्षी सेवानिवृत्तीचे वय करायचे या अनुषंगाने विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालय आणि इतर शासकिय सेवेतून दर वर्षी २ तृतीयांश कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. साधारणत: ५०० ते १५०० इतक्या संख्येने कर्मचारी निवृत्त होतात. या रिक्त जागा भरायच्या म्हटले तर त्यांच्यासाठी जाहीरात देणे, परिक्षा आणि मुलाखती घेणे भविष्यकाळातील कोरोनाची परिस्थितीचा अंदाज घेवून करणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुंबई बाहेर ज्यांना विशेष विनंती बदली हवी आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही तात्काळ मुंबई बाहेर बदली देण्यासंदर्भातही शासन विचार करत आहे. जेणेकरून सदरचे कर्मचारी त्यांच्या मुळ गावी जावून तेथील कार्यालयात काम करू शकतील. त्यामुळे याबाबतही शासन गंभीर विचार करत असून त्यासंदर्भातील शासन निर्णयही लवकरच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *