Breaking News

शरद पवारांनी या रूग्णांसाठी तात्काळ दिली १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.

आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली.

दरम्यान कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा याचे पुन्हा एक नवे उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले.

Check Also

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *