Breaking News

रेशन कार्ड नसलेल्या गरजूनाच अन्नधान्याचे किट द्या मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे परराज्यातील, राज्यांतर्गंत परजिल्ह्यातील कामगार-नागरीकांसमोर अन्नधान्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर काही स्वंयसेवी संस्थांनी अन्नधन्नाची पाकिटे वाटप करण्यास सुरुवात केली असून ही पाकिटे रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरीकांनाच द्यावी असे आदेश मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने दिले.

विशेष म्हणजे या अन्नाची पाकिटे वाटताना रेशन दुकानात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आली असून या वाटपाच्या सर्व नोंदी मुंबई महापालिका आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयास पाठवून द्यावी असे आदेशही बजाविण्यात आलेत.

त्यासाठी प्रभागनिहाय गरजूंची संख्या पाहून त्या त्या भागत वाटप करावे अशी सूचना करत हि अन्नधान्याचे किट फक्त गरजू ज्यांच्याकडे शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड नाही त्यांनाच वाटप करण्याचे आदेश दिले आहेत

.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *