Breaking News

मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची नव्याने भरली आहे. तर जवळपास १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

त्यामुळे भविष्यकाळातील मुंबई, पुणेसह राज्यातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यातील संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेवून बाहेर येण्या-जाण्यावर स्वत:हूनच निर्बंध घालावेत असे आवाहन करत मुंबईतील धारावी सारख्या भागात एसआरपीएफ दलाला पाचारण करावे लागणार असून तशी शिफारस राज्याच्या गृहमंत्र्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धारावी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील सार्वजनिक स्वच्छतागृहे सातत्याने स्वच्छ करणे, कम्युनिटी किचन सुरु करणे, सँनिटायझरची फवारणी करणे यासाठी काही यंत्रांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत जिल्हानिहाय रूग्णांची संख्या-

मुंबई- ८७६ (मृत-५४), पुणे-१८१ (मृत-२४), पिंपरी-चिंचवड- १९, पुणे ग्रामीण-६, ठाणे मनपा-२६ (मृत-३), कल्याण डोंबिवली-३२ (मृत-२), नवी मुंबई मनपा-३१ (मृत-२), मीरा भाईंदर-४(मृत-१), वसई विरार- ११ (मृत-२), पनवेल मनपा-६, ठाणे ग्रामीण-पालघर ग्रामीण- प्रत्येकी ३ (पालघर ग्रा.मृत्यू-१), सातारा-६ (मृत-१), सांगली- २६, नागपूर-१९ (मृत-१), अहमदनगर-१६, बुलढाणा-११(मृत-१). अहमदनगर ग्रामीण-९, औरंगाबाद मनपा-१६ (मृत-१), लातूर मनपा-८, अकोला-९, मालेगांव-५(मृत-१), रत्नागिरी:यवतमाळ:उस्मानाबाद: अमरावती मनपा- प्रत्येकी ४ (मृत-रत्नागिरी, अमरावती प्रत्येकी २), कोल्हापूर मनपा-५, उल्हासनगर: नाशिक:नाशिक ग्रामीण: जळगाव मनपा-ग्रामीण, जालना:हिंगोली: वाशिम: गोंदीया:बीड: सिंधुदूर्ग- प्रत्येकी १, इतर राज्ये- ८.

तर ३६ हजार ५३३ जण हे घरगुती विलगीकरणात असून ४ हजार ७३१ जण संस्थांत्मक विलगीकरणात आहेत.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *