Breaking News

देशातील १० दिवसांपूर्वीच्या रूग्ण आकड्याशी राज्याची बरोबरी ५८३ नवे रूग्णांच्या निदानासह १० हजार ४९८ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील २४ तासात राज्यात ५८३ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली. तर आज पुन्हा २७ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत १७७३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
विशेष म्हणजे १० दिवसापूर्वी देशातील कोरोनाबाधींताची संख्या १० हजारावर पोहोचली होती. त्या आकड्यावर आता राज्यही पोहोचल्याने देशाच्या पावलावर राज्यही पाऊल तर ठेवत नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई शहरानेही कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा ७ हजाराचा ओलांडला असून ७ हजार ६१ वर बाधितांची संख्या पोहोचली आहे. तर मुंबईसह महानगरप्रदेशाची संख्या ८ हजार २४४ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,४५,७९८ नमुन्यांपैकी १,३४,२४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०,४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७३३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,०९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४२.११ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून १,७७३ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात १,६८,२६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १०,६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ७०६१ २९०
ठाणे ४८
ठाणे मनपा ४१२
नवी मुंबई मनपा १७४
कल्याण डोंबवली मनपा १६३
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा १७
मीरा भाईंदर मनपा १२६
पालघर ४१
१० वसई विरार मनपा १२८
११ रायगड २४
१२ पनवेल मनपा ४७
ठाणे मंडळ एकूण ८२४४ ३१३
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा २०
१५ मालेगाव मनपा १७१ १२
१६ अहमदनगर २६
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे
१९ धुळे मनपा १७
२० जळगाव ३०
२१ जळगाव मनपा १०
२२ नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण ३१५ २७
२३ पुणे ६३
२४ पुणे मनपा १११३ ८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ९२
२८ सातारा ३२
पुणे मंडळ एकूण १३७९ ९६
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण ५३
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा १२९
३७ जालना
३८ हिंगोली १५
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १५०
४१ लातूर १२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
लातूर मंडळ एकूण १९
४७ अकोला १२
४८ अकोला मनपा २७
४९ अमरावती
५० अमरावती मनपा २६
५१ यवतमाळ ७९
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण १६९
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १३३
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण १४३
इतर राज्ये २६
एकूण १०४९८ ४५९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *