Breaking News

९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या पोहोचली आहे.
एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ६ हजार १६९ तर मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आतापर्यंत १३८८ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. मृत पावलेल्यांमध्ये मुंबईतील रूग्णांची संख्या २५, जळगांवचे ४, पुण्यातील २ जणांचा समावेश आहे. यापैकी १६ पुरूष तर १५ महिलांचा समावेश आहे. ६० वर्षावरील २० रूग्णांचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर ४० ते ५९ वयोगटातील १०, ४० वर्षाखालील १ चा समावेश आहे. यातील २० रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यत १ लाख २९ हजार ९३१ नमून्यांपैकी १ लाख २० हजार १२६ जणांचे नमूने निगेव्टीव्ह आहेत. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार १७० नागरीक होम क्वारंटाईन मध्ये आहेत. तर ९ हजार ९१७ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ६१६९ २४४
ठाणे ४५
ठाणे मनपा ३४४
नवी मुंबई मनपा १४२
कल्याण डोंबवली मनपा १५३
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा १४
मीरा भाईंदर मनपा १२३
पालघर ४१
१० वसई विरार मनपा १२३
११ रायगड २२
१२ पनवेल मनपा ४४
  ठाणे मंडळ एकूण ७२२३ २६३
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा १९
१५ मालेगाव मनपा १७१ १२
१६ अहमदनगर २६
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे
१९ धुळे मनपा १७
२० जळगाव ३०
२१ जळगाव मनपा १०
२२ नंदूरबार ११
  नाशिक मंडळ एकूण ३१३ २७
२३ पुणे ५८
२४ पुणे मनपा १०४४ ७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ७५
२८ सातारा ३२
  पुणे मंडळ एकूण १२८८ ८९
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
  कोल्हापूर मंडळ एकूण ४८
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ८९
३७ जालना
३८ हिंगोली १५
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १०८
४१ लातूर १२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १९
४७ अकोला १२
४८ अकोला मनपा २२
४९ अमरावती
५० अमरावती मनपा २६
५१ यवतमाळ ७१
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण १५५
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १३१
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण १३९
  इतर राज्ये २५
  एकूण ९३१८ ४००

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *