Breaking News

घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ मात्र मृतकांची संख्या सर्वाधिक एकूण संख्या ६२ हजारवर पोहोचत अॅक्टीव्ह रूग्ण ३३ हजारावर

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आज तब्बल ८ हजार ३८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुसऱ्याबाजूला याच आजाराने मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज २ हजार ६८२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ११६ रूग्ण २४ तासात मृत पावल्याची नोंद झाली आहे. याशिवाय एकूण रूग्णांची संख्या ६२ हजार २२८ इतकी झालेली असली तरी अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३३ हजार १२४ इतकी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ५८ मुंबई -३८, नवी मुंबई -९, भिवंडी -३, रायगड – २, मीरा भाईंदर -३, पनवेल १, ठाणे – १, कल्याण डोंबवली -१.
नाशिक ३२ जळगाव -१७, नाशिक -३, मालेगाव -५, धुळे -७
पुणे १६ पुणे  -१३, सोलापूर -३
कोल्हापूर कोल्हापूर -३
औरंगाबाद औरंगाबाद -५
अकोला अमरावती   – २

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,३३,५५७ नमुन्यांपैकी ६२,२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,६०० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६७.६८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

काही महत्वाच्या नोंदी

  • राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ % एवढे आहे.
  • राज्यातील मृत्यू दर – ३.३७ %
  • सध्या राज्यात ५,३५,४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ३६९३२ १६००८ ११७३ १९७४५
ठाणे ८६३८ २७२९ १७२ ५७३७
पालघर ९१३ २८० २३ ६१०
रायगड ९९९ ५१८ २९ ४५०
नाशिक १०७० ८१८ ६० १९२
अहमदनगर ९६ ५२ ३८
धुळे १३५ ७० १६ ४९
जळगाव ५५५ २६३ ६९ २२३
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३३ २० १०
१० पुणे ७२२३ ३४२५ ३१४ ३४८४
११ सोलापूर ७६९ ३१४ ६२ ३९३
१२ सातारा ४५९ १४५ १६ २९८
१३ कोल्हापूर ३७९ ८७ २८८
१४ सांगली १०४ ५३ ५०
१५ सिंधुदुर्ग २१ १४
१६ रत्नागिरी २१६ ८८ १२३
१७ औरंगाबाद १४१० ९५९ ६५ ३८६
१८ जालना ११७ ३२ ८५
१९ हिंगोली १४३ ९७ ४६
२० परभणी ४२ ४०
२१ लातूर १०८ ५२ ५३
२२ उस्मानाबाद ६४ १३ ५१
२३ बीड ४६ ४१
२४ नांदेड १०८ ८२ २०
२५ अकोला ५३७ २७५ २८ २३३
२६ अमरावती २०२ ११७ १६ ६९
२७ यवतमाळ १२८ ९२ ३६
२८ बुलढाणा ५६ २९ २४
२९ वाशिम
३० नागपूर ५११ ३४२ १६०
३१ वर्धा ११ १०
३२ भंडारा २५ २४
३३ गोंदिया ५८ ५५
३४ चंद्रपूर २५ १६
३५ गडचिरोली ३१ २६
इतर राज्ये /देश ५६ १३ ४३
एकूण ६२२२८ २६९९७ २०९८ ३३१२४

मान्सूनपूर्व तयारी

मान्सून उंबरठयावर उभा आहे, हे लक्षात घेता येणा-या काळात कोविड १९ शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोविड १९ साठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे. सध्या उपलब्ध रुग्णालयीन सुविधांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र रुग्णालयाचा प्रकार एकूण संस्था एकूण खाटा

( आय सी यू वगळून)

अतिदक्षता विभागातील खाटा एकूण व्हेंटीलेंटर उपलब्ध प्रतिबंधात्मक पोषाख ( पी पी ई) उपलब्ध एन ९५ मास्क
कोविड रुग्णालये २७५ ३३५३८ ५००३ २०२८ २५६४८५ ४३१२१४
कोविड आरोग्य केंद्र ४४९ २८९२७ २१३७ ६१५ ६४३०८ २११८४७
कोविड निगा केंद्र १६४३ २०६४२८ १५४८६० ३२५९६१
इतर रुग्णालये २०५ ९५६६ १३६१ ४२३ २७९१ ५६९५
एकूण २५७२ २७८४५९ ८५०१ ३०६७ ४७८४४४ ९७४७१७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *