Breaking News

मुंबई महानगर आणि राज्याच्या रूग्णसंख्येत अवघा १० हजाराचा फरक महानगराची संख्या पोहचली ३६ हजार १७३ तर राज्याची ४७ हजार १९०

मुंबई: विशेष प्रतिनिधी
कोरोनाबाधीतांच्या संख्येत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असली तरी या दोघांमध्ये अवघा १० हजार ११७ रूग्णसंख्येचा फरक आहे. राज्याच्या एकूण संख्येपैकी ७० ते ८० टक्के संख्या ही मुंबई महानगर असून आज झालेल्या २ हजार ६०८ रूग्ण संख्येमुळे ३६ हजार १७३ वर पोहोचली आहे. तर राज्याची संख्या ४७ हजार १९० वर पोहोचली आहे. त्यामुळे एकट्या मुंबईत ३६ हजार रूग्ण तर राज्यात अवघे १० हजार रूग्ण असल्याचे स्पष्ट होत आहे. आज ८२१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १३,४०४. करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साता-यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १५७७ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,४८,०२६ नमुन्यांपैकी २,९८,६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७,१९०जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे -1.आजपर्यंत राज्यातून १३,४०४ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 2.सध्या राज्यात ४,८५,६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३,५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २८८१७ ९४९
ठाणे          ३९४
ठाणे मनपा २४०५ ३५
नवी मुंबई मनपा १८७८ २९
कल्याण डोंबवली मनपा ७८४
उल्हासनगर मनपा १४५
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८२
मीरा भाईंदर मनपा ४४२
पालघर १११
१० वसई विरार मनपा ४९९ १५
११ रायगड ३२१
१२ पनवेल मनपा २९५ १२
ठाणे मंडळ एकूण ३६१७३ १०६९
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा १०५
१५ मालेगाव मनपा ७११ ४४
१६ अहमदनगर ५३
१७ अहमदनगर मनपा १९
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २९० ३६
२१ जळगाव मनपा ११३
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १५३५ १०३
२३ पुणे ३१२
२४ पुणे मनपा ४८०५ २४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३०
२६ सोलापूर २२
२७ सोलापूर मनपा ५४५ ३४
२८ सातारा २०४
पुणे मंडळ एकूण ६११८ २९७
२९ कोल्हापूर २०६
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ६३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १४२
कोल्हापूर मंडळ एकूण ४५५
३५ औरंगाबाद २२
३६ औरंगाबाद मनपा ११९७ ४२
३७ जालना ५४
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १४०७ ४३
४१ लातूर ६४
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद २९
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
लातूर मंडळ एकूण २२०
४७ अकोला ३१
४८ अकोला मनपा ३४२ १५
४९ अमरावती १३
५० अमरावती मनपा १४३ १२
५१ यवतमाळ ११३
५२ बुलढाणा ३९
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ६८९ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६२
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया ३९
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १३
नागपूर एकूण ५४५
इतर राज्ये /देश ४८ ११
एकूण ४७१९० १५७७

 

 ( टीपआय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ६१ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *