Breaking News

रेकॉर्ड ब्रेक संख्या रूग्णांची मुंबईत तर राज्यात मृतकांची १४११ रूग्ण मुंबईत तर ७४ मृत पावले राज्यात

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईतील रूग्णांची संख्या एकदम १४११ संख्येने वाढल्याने मुंबईतील रूग्णांची संख्या २२ हजाराच्यावर गेली आहे. तसेच १२०२ रूग्ण बरे होवून घरी गेले असून बरे होणाऱ्यांच्या संख्येत ९ हजार ६३९ संख्येवर पोहोचली त्यांनी सांगितले.
मृत्यू –
राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४३, ठाणे शहरात १५, पुण्यात ६, अकोल्यात ३, नवी मुंबईमध्ये २, बुलढाणा २, नागपूर शहरात २, औरंगाबाद शहरात १, धुळे शहरात १ तर नाशिक शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर ३९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५८ जणांमध्ये ( ७६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १३२५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ३० एप्रिल ते १६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४४ मृत्यूंपैकी २२ मुंबईचे, १५ ठाण्याचे, अकोला मनपाचे २ तर बुलढाणा १, धुळे १, नागपूर १ नाशिक १ आणि पुण्यातील१ आहे.
प्रयोगशाळा तपासण्या – आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,९३,९९८ नमुन्यांपैकी २,५६,८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७,१३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना – राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १७६५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,१७८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.२९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
2. सध्या राज्यात ३,८६,१९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१,१५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २२७४६ ८००
ठाणे          २५३
ठाणे मनपा १९१६ ३३
नवी मुंबई मनपा १५०४ २४
कल्याण डोंबवली मनपा ५५७
उल्हासनगर मनपा १०३
भिवंडी निजामपूर मनपा ५०
मीरा भाईंदर मनपा ३३१
पालघर ६७
१० वसई विरार मनपा ३९६ ११
११ रायगड २६४
१२ पनवेल मनपा २४४ ११
  ठाणे मंडळ एकूण २८४३१ ९०४
१३ नाशिक १०४
१४ नाशिक मनपा ८२
१५ मालेगाव मनपा ६५४ ३४
१६ अहमदनगर ४२
१७ अहमदनगर मनपा १८
१८ धुळे १३
१९ धुळे मनपा ७१
२० जळगाव २३३ २९
२१ जळगाव मनपा ७०
२२ नंदूरबार २५
  नाशिक मंडळ एकूण १३१२ ८५
२३ पुणे २१२
२४ पुणे मनपा ३८४६ २०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ४३० २४
२८ सातारा १४२
  पुणे मंडळ एकूण ४८२१ २३८
२९ कोल्हापूर ६२
३० कोल्हापूर मनपा १९
३१ सांगली ४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
३४ रत्नागिरी १०२
  कोल्हापूर मंडळ एकूण २४८
३५ औरंगाबाद १६
३६ औरंगाबाद मनपा १०१२ ३४
३७ जालना ३८
३८ हिंगोली १०७
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ११८१ ३५
४१ लातूर ४७
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ११
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ७०
  लातूर मंडळ एकूण १४५
४७ अकोला २८
४८ अकोला मनपा २५९ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ११२ १२
५१ यवतमाळ १०१
५२ बुलढाणा ३३
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ५४३ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३८६
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ४०९
  इतर राज्ये /देश ४६ ११
  एकूण ३७१३६ १३२५

Check Also

कोरोना : बरे होणाऱ्या रूग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या दुप्पट ४ हजार २३७ नवे बाधित, २ हजार २३७ बरे होणारे तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी दिवाळीचा सण सुरू होवून दोन दिवस झाले नाही तोच बरे होणाऱ्या रूग्णांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *