Breaking News

चला आर्थिक हातभार लावू या कोरोना विरोधी लढ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19, पीएम केअरस् खात्यात जमा करू या निधी

मुंबई : प्रतिनिधी

कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

 

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

 

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रीयस्तरावर कोरोना विषाणू विरूध्दच्या लढ्यासाठी देशवासियांसाठी पीएम केअर नावाने नवे बँक खाते सुरु केले आहे. या खात्यात नागरिकांनी १० रूपयापासून कितीही रूपयांचे देणगी देवू शकता असे सांगत जास्तीत जास्त नागरीकांनी निधी द्यावे असे आवाहन केले.

त्याची माहिती खालीलप्रमाणे

बँक खात्याचे नाव- पीएम केअरस्

खाते क्रमांक-२१२१पीएम२०२०२

आएफएससी कोड-एसबीआयएन००००६९१

स्वीफ्ट कोड-एसबीआयएनआयएनबीबी१०४

बँकेचे नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया, नवी दिल्ली, मुख्य शाखा.

या खात्यावर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डस्, इंटरनेट बँकींग, भीम अँप, फोन पे, अँमेझॉन पे, गुगल पे, पे टीएम, मोबीक्वीक, आरटीजीएस-एनईएफटी मार्फत आपण निधी जमा करू शकता.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *