Breaking News

३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजार २३१ वर पोहोचला असताना आतापर्यंत १६३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, पुण्यात ६, सोलापूरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,६२,८६२ नमुन्यांपैकी ३,१२,६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५०,२३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
 क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २२८३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,९१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे – 1.आजपर्यंत राज्यातून १४,६०० रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 2.सध्या राज्यात ४,९९,३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३०५४२ ९८८
ठाणे          ४२०
ठाणे मनपा २५९० ३६
नवी मुंबई मनपा २००७ २९
कल्याण डोंबवली मनपा ८८९
उल्हासनगर मनपा १६९
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८६
मीरा भाईंदर मनपा ४६४
पालघर ११४
१० वसई विरार मनपा ५६२ १५
११ रायगड ४१२
१२ पनवेल मनपा ३३० १२
  ठाणे मंडळ एकूण ३८५८५ १११०
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा ११०
१५ मालेगाव मनपा ७११ ४४
१६ अहमदनगर ५३
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ९५
२० जळगाव २९४ ३६
२१ जळगाव मनपा ११७
२२ नंदूरबार ३२
  नाशिक मंडळ एकूण १५७० १०३
२३ पुणे ३४०
२४ पुणे मनपा ५०७५ २५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २६७
२६ सोलापूर २४
२७ सोलापूर मनपा ५७७ ३९
२८ सातारा २७९
  पुणे मंडळ एकूण ६५६२ ३०९
२९ कोल्हापूर २३६
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ६९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १५५
  कोल्हापूर मंडळ एकूण ५०४
३५ औरंगाबाद २३
३६ औरंगाबाद मनपा १२३३ ४६
३७ जालना ५६
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १४४६ ४७
४१ लातूर ६७
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३१
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
  लातूर मंडळ एकूण २२६
४७ अकोला ३६
४८ अकोला मनपा ३६६ १५
४९ अमरावती १३
५० अमरावती मनपा १५५ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ४०
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ७३३ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६४
५६ वर्धा
५७ भंडारा १०
५८ गोंदिया ३९
५९ चंद्रपूर १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १३
  नागपूर एकूण ५५६
  इतर राज्ये /देश ४९ ११
  एकूण ५०२३१ १६३५

( टीपआय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ९७ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *