Breaking News

तुम्ही आमच्यासाठी बाहेर तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर ठाणे शहरातील नवतरूणांकडून असाही मदतीचा हात

ठाणे: प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांवर रोजगार बंद झाल्याने घरात बसण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांसाठी झटणाऱ्या पोलिस, होमगार्ड आणि कष्टकरी वर्गाला दोन वेळचे घास सुखाने खाता यावेत यासाठी शहरातील परिक्षित धुमे आणि त्याची मित्रमंडळी तयार जेवणाचे पाकिट्स आणि अन्न धान्याचे पाकिटे स्वखर्चाने तर कधी इतरांच्या सहाय्याने प्रत्येकांपर्यत पोहोचवित आहेत.

शहरातील नाक्या-नाक्यावर पोलिस आणि होमगार्डस नागरिकांसाठी ऊना-ताणात उभे आहेत. यातील अनेकांची घरे ही त्यांना लावण्यात आलेल्या बंदोबस्तापासून लांब आहेत. त्यांमुळे त्यांची खाण्या-पिण्याची आबाळ होत असणार. हीच कथा कष्टकरी वर्गाची आहे. या दोघांनाही त्यांच्या वेळेला मदत आणि अन्नधान्य उपलब्ध करून सेवा देण्याची वेळ असल्याने ते आमच्यासाठी बाहेर आहेत. तर त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहिले पाहिजे या भावनेतून अन्नाची तयार पाकिटे आणि अन्न धान्याची पाकिटे आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवित असल्याचे परिक्षित धुमे याने सांगितले.

या सेवेसाठी त्याच्या मित्रमंडळी त्याच्या सोबत आली असून जवळपास १० ते १२ जण रोज पोलिस-होमगार्डना जेवणाची तयार पाकिटे पोहोचविणे, मास्कचे वाटप करणे आदी गोष्टी करत आहेत.

याशिवाय कष्टकरी वर्ग रहात असलेल्या ठिकाणी असलेल्या कामगार वर्गांना डाळ, तांदूळ, तेल आदींची पाकिटे आणि सोबत एक मास्कचे वाटप त्या त्या भागात जावून करण्यात येत आहे. यासाठी लागणारा खर्च बहुतांषवेळा आम्ही स्वत:च्या खिशातून आणि कधी कधी परिचित व्यक्तींकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येतो. आतापर्यंत ४ हजारहून अधिकजणांपर्यॅत आम्ही पोहोचलो आहोत. आणखीही गरजूंपर्यत पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले.

 

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *