Breaking News

मंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनामुळे ऐजबार होणाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनामुळे राज्यातील मेघा नोकरभरती स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीत ऐजबार अर्थात वयोमर्यादा उलटून गेलेल्या तरूण-तरूणींनाचा विचार करण्याची गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही हा विषय राज्याच्या मंत्रिमंडळात आल्यानंतर त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याची भूमिका राज्यातील काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली.

मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. मात्र या सुनावणीच्या निमित्ताने अनेक उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

मराठा आरक्षणाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचा मुद्दा काही जणांनी उपस्थित केला. यासंदर्भात मे २०२०  रोजी यासंदर्भात सरकारने शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे नोकरी भरती थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा पूर्णपणे निपात होईल हे अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे याकालावधीत वयोमर्यादा काही जणांची उलटून जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *