Breaking News

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण झाले दिडलाख तर मृतकांची संख्या १५ हजाराच्या जवळ १० हजार ३२० नवे बाधित, ७५४३ घरी गेले, २६५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील आज १० हजार ३२० नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५० हजार ६६२ वर पोहोचली असून एकूण रूग्ण संख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली. तर ७५४३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ५६ हजार १५८ वर पोहोचली असून २६५ मृतकांची नोंद झाली असून एकूण मृतकांची संख्या १५ हजाराच्या घरात पोहचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील काही दिवसात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येतही चांगलीच वाढ होत असल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के इतका झाला आहे. तर ३.५५ टक्के इतके मृत्यूदर आहे. आतापर्यत २१ लाख ३० हजार ९८ इतके प्रयोगशाळा नमूने पाठविण्यात आले होते.  यापैकी ४ लाख २२ हजार ११८ इतके नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तर ८ लाख ९९ हजार ५५७ इतक्या व्यक्ती घरगुती विलगीकरणात आणि ३९ हजार ५३५ इतक्या संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *