Breaking News

विद्यापीठाच्या परीक्षाही आता लॉकडाऊननंतरच नवे वेळापत्रक मे मध्ये जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारने ३ मे पर्यत लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परिक्षा ३ मे नंतर घेण्याचा निर्णय घेतला असून लॉकडाऊन संपल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्याच्या सर्व तारखाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.
१५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील टाळेबंदीचा (Lockdown) कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच्या आदेशनानुसार आणि तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखाही लांबणीवर
२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे व जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर म्हणाले की, कोरोना-१९ मुळे टाळेबंदीचा (Lockdown) कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर युजीसी, राज्य शासन व विद्यापीठ परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूवक विचार करीत आहे. अनेकांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत, यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता, या कालावधीत त्यांनी घरात बसून युट्युब व ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास करावा, अभ्यासाच्या काही समस्या असतील तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात.

।। २०२० च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा ।।

Sr. अ.क्र          विद्याशाखा Faculties                                          परीक्षा संख्या No.of Eaxms.

  1.           मानव्य विद्याशाखा Humanities                                          95
  2.         वाणिज्य व व्यवस्थापन Commerce & Management        101
  3.    विज्ञान व तंत्रज्ञान Science & Technology                                 381
  4.  आंतरविद्याशाखीय अभ्यास Interdisciplinary Studies            182
    एकूण परीक्षा Total Exams.                                                 759

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *