Breaking News

कोरोना: आजही मुंबईत सर्वाधिक मृत्यू तर रूग्णसंख्येतही वाढच काल ११४ आज १३६ जणांचा मुंबईत मृत्यू तर ३८७४ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत वाढच होत असून रूग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. दैनदिंन रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत मुंबईतील संख्याचा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात राज्यात १६० जणांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना यातील १३६ जणांच्या मृत्यूची संख्या एकट्या मुंबईतील आहे. काल हिच संख्या ११४ वर होती. नव्या बाधीत रूग्णांची संख्याही वाढलेली असून आज ३ हजार ८७४ इतक्याजणांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्याची एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख २८ हजारांवर पोहोचली असून यापैकी ५८ हजार ५४ संख्या ही अॅक्टीव्ह रूग्णांची आहे. तर ६४ हजार १५३ जण बरे होवून घरी गेले आहेत. यात आज १३८० जण घरी गेलेल्यांची संख्याही समाविष्ट आहे. राज्यातील मृतकांची संख्या आता ५ हजार ९८४ अर्थात ६ हजाराच्या घरात पोहोचली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.०४ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ४.६७ %. सध्या राज्यात ५,९४,७१९ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,०९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू – राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे १३६ मुंबई -१३६
नाशिक १० जळगाव – १०
पुणे पुणे – ५, सोलापूर -१
औरंगाबद औरंगाबाद – ६, जालना -१.
लातूर बीड – १

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६५३२९ ३२८६७ ३५६१ २८८९३
ठाणे २३२१२ ९२८४ ६७५ १३२५२
पालघर ३२२५ १०४५ ८८   २०९२
रायगड २३९९ १५१९ ८९ ७८९
रत्नागिरी ४८२ ३३० १७   १३५
सिंधुदुर्ग १६३ १२५   ३४
पुणे १५२८६ ८३२४ ५८७   ६३७५
सातारा ८२३ ५६५ ३८ २१९
सांगली २८२ १५६   ११९
१० कोल्हापूर ७३९ ६६६   ६५
११ सोलापूर २१७८ १००० १७२   १००६
१२ नाशिक २६३५ १४४९ १४५   १०४१
१३ अहमदनगर २७३ २०८ ११   ५४
१४ जळगाव २१८३ ११३६ १८२   ८६५
१५ नंदूरबार ८३ ३६   ४२
१६ धुळे ४८३ ३२१ ४६ ११५
१७ औरंगाबाद ३२७३ १७८७ १७३   १३१३
१८ जालना ३६० २३० ११   ११९
१९ बीड ८४ ६२   १९
२० लातूर २१२ १३६ ११   ६५
२१ परभणी ८४ ७४  
२२ हिंगोली २५२ २०३   ४८
२३ नांदेड २७९ १७५ ११   ९३
२४ उस्मानाबाद १६९ १२६   ३७
२५ अमरावती ४१६ २७८ २१   ११७
२६ अकोला ११६४ ७५३ ५९ ३५१
२७ वाशिम ७० १७   ५१
२८ बुलढाणा १५६ १०४   ४७
२९ यवतमाळ २३० १५६   ६७
३० नागपूर १२७१ ८०९ १३   ४४९
३१ वर्धा १४ ११  
३२ भंडारा ७१ ४९   २२
३३ गोंदिया १०१ ६९   ३२
३४ चंद्रपूर ५८ ४०   १८
३५ गडचिरोली ५४ ४३   १०
  इतर राज्ये/ देश ११२ २०   ९२
  एकूण १२८२०५ ६४१५३ ५९८४ १४ ५८०५४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *