Breaking News

सोलापूरात रूग्णांचा आकडा ३०० पार २४ तासात ३१ रूग्णांचे निदान : २ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी
काल सोलापूरात अवघे २ रूग्णांचे निदान झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले. मात्र आज २४ तासात नव्याने ३१ रूग्ण आढळून आले असून ,रूग्णांची संख्या ३०८ वर पोहोचल्याने पुन्हा जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक बनले. तसेच आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला.
३ हजार ५०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३६० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ३०८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. २४ तासात १२९ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ९८ जणांचे अहवाल निगेटीव्ह तर ३१ जणांचे पॉझिटीव्ह आले.
आज निदान झालेले रूग्ण हे साईबाबा चौक ६, लष्कर सदर बझार २, शास्त्री नगर ४, नवनाथ नगर १, भारतरत्न इंदिरा नगर ७, रामलिंग नगर १, कुमारस्वामी नगर १, बेगम पेठ १, केशव नगर १, गवळी वस्ती-जुना कुंभारी रोड १, जुळे सोलापूर १, एकता नगर १, इंदिरा वसाहत भवानी पेठ १, पोलिस मुख्यालय १, रंगभवन १, रविवार पेठ १ ठिकाणी आढळून आले आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *