Breaking News
Mantralay
Mantralaya

मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उद्याच माहिती सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी
मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच या आजाराचे रूग्ण मंत्रालयातही सापडले. त्यातच या आजाराची लागण होण्याचा धोका ४० वयापुढील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर धोका असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्रालयात कार्यरत असलेल्या ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती जमा करून त्यानुसार त्यांच्यावर कामाचे जबाबदारी सोपविण्याचा विचार सुरु असल्याने अशांची माहिती उद्याच सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईतील शासकिय कार्यालयांमध्ये ५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तरीही अनेक कर्मचारी-अधिकारी कोरोनाच्या भीतीमुळे कार्यालयात हजर होत नाहीत. तर काहीजण गावी जावून राहीलेले अद्यापही तिकडेच आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सध्या मुंबई महानगर पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे कमी वयोगटातील अर्थात ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्याची निश्चित आकडेवारी जमा करून त्यानुसार त्या त्या विभागाची तसेच कोरोनाच्या कामासाठी नियुक्त करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच ४५ वयाच्या पुढील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी बसूनच काम करण्यास मुभा देण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगितले.
मात्र कोणत्या वयोगटातील किती व्यक्ती मंत्रालयात आहेत. याची माहिती होणे आवश्यक असल्याने यासंबधीचा आदेश सर्व विभागांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *