Breaking News

एसटी प्रवाशांना खुषखबर, पासला मुदतवाढ किंवा परतावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली.
२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप २२ मार्च पुर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक /त्रेमासिक पास काढले होते. परंतु एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक/ त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *