Breaking News

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी दिली.
१. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतात. त्यामुळे जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावीत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

२. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवार पासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

३. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सनिट्झरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.

४. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.

५. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीयेत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.

६. कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,

ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, माझी सर्वांना विनंती आहे, वर दिल्याप्रमाणे योग्य माहिती भरून आपापल्या घरी परत जा, कृपया पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये.

Check Also

“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *