Breaking News

मिशन बिगीन अगेनमध्ये मुंबईसह राज्यात या सवलती नव्याने मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
रूतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना आणि थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा सुरुळीत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेत काही गोष्टी शिथीलही केल्या. मात्र आता त्यात नव्याने काही सवलती समाविष्ट करण्यात आल्याने मिशन बिगीन अगेन आणखी सुसह्य झाला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिक सवलती खालीलप्रमाणे-
पहिल्या टप्यात-बाग-बगीछे, खुल्या व्यायामशाळा, मोकळ्या जागेतील खेळाचे स्विंग्ज, बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे याआधी दिलेल्या सवलतीत या नव्या सवलतीची भर पडली आहे.
दुसरा टप्पा-रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकांनापैकी एकसाईडची दुकाने एक दिवसाआड सुरु करण्यात येतील. त्यासाठी स्थानिक प्रशासन व्यापारी संघटनेबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढेल.
तिसऱ्या टप्प्यात– वर्तमानपत्र घरोघरी वितरणास परवानगी देण्यात आली आहे.
याशि‌वाय शैक्षणिक कामकाजाशिवाय सर्व शाळा, कॉलेज, विद्यापीठांची कार्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या संस्थांच्या कार्यालयातून रखडलेले कामकाज पूर्ण करणे, उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्याचे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय मुंबई महानगरात प्रवासाला परवानगी देण्यास परवानगी देत आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *