Breaking News

नांदेड, रायगड, औरंगाबादेत अडकलात, तेथून मूळ गावी जायचेय ? तर हे वाचा जिल्हा प्रशासनाकडे कसे अर्ज सादर करायचे आणि कोठे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील विविध भागातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू आदी अडकलेले आहेत. सद्यपरिस्थितीत नांदेड, रायगड आणि औरंगाबाद येथे अशा अडकलेल्यांनासाठी त्या त्या स्थानिक प्रशासनाने वेबसाईटची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार आपला अर्ज आणि फोनवरून संपर्क साधून आपल्या मूळ गावी जावू शकता.

नांदेड जिल्ह्यातील Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत.

1) नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो
File Size 200 kb पर्यंत

2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र आपल्या पत्त्यासह किंवा आधारकार्ड
File size 500 KB पर्यंत
https://covid19.mhpolice.in/
अधिक माहितीसाठी संपर्क करा
02462 249279
02462 235077
[email protected]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
तथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

रायगड जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला
आज रोजी रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5
भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी…

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOouvUI_w6sXNvmi7pxSoryj3e3d2b7zOkIwmL8kY9Swnnnw/viewform?usp=sf_link

आपण सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा/राज्य तील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून रायगड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर माहिती भरून आम्हाला सहकार्य करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
०२१४१-२२२११८
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हाधिकारी कार्यालय रागयड

औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा परराज्यात जाण्यासाठी तसेच इतर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून औरंगाबाद जिल्ह्यात येण्यासाठी http://covid19.mhpolice.in/ लिंकचा वापर करावा. यात आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे.
आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून तात्काळ ऑनलाइन पास देण्याची कारवाई करण्यात येईल. शहरासाठी ही कार्यवाही पोलीस आयुक्तालय मार्फत केली जाईल तर ग्रामीण भागासाठी ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाईल.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की याव्यतिरिक्त कोठेही पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
प्रथम आपला फॉर्म नीट भरला असल्याबाबत खात्री करावी तरीदेखील याबाबत अडचण आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतात:
0240 2331077
याशिवाय कोणतेही राज्य किंवा विभागीय किंवा जिल्हा नोडल अधिकारी यांना फोन करण्याची किंवा मेसेज करण्याची आवश्यकता नाही

Check Also

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांच्यात औरंगजेबाची वृती

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रासह देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध राजकिय पक्षांकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *