Breaking News

अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच आर्थिक केंद्रे बंद असल्याने तिजोरीत फारसा महसूल जमा झाला नाही. तसेच विद्यमान परिस्थितीतही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कामांसाठी लागणारा निधी कसा जमा केला जातोय याची माहिती आम्हालाच असल्याचे स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमुत्री अजित पवार यांनी दिली.
जळगांव, सोलापूर यासह अन्य भागात जी काही रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्या संख्या तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे दिसून येते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील नागरिकांनी केंद्र व राज्य सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. जनतेने प्रतिसाद दिला नाही आणि मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगची उणीव राहिली तर फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यातील शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित होता तो पवारसाहेब यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यावर मार्ग निघाला आहे. शिवाय आशा वर्कर्स यांचे प्रश्न आहेत. त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना संपावर जाण्याची वेळ महाविकास आघाडी सरकार आणू देणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत करण्यात येत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सनदी अधिकाऱ्यांच्या कामाचे मुल्यमापन करूनच त्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यासाठी वेगळे निकष वापरत येत असले अशी काही गोष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, माजी आमदार लक्ष्मण माने, अभिनेते शरद पोंक्षे, ट्रस्टचे विश्वस्त व माजी आमदार हेमंत टकले, मार्डचे अध्यक्ष दिपक मुंडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संतोष कदम आदी उपस्थित होते.
संकटात सापडलेल्या जनतेला मदतीची खात्री देण्याचे काम केले – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचे हित जपूनच संकटात सापडलेल्या जनतेला मदतीची खात्री देण्याचे काम कालही केले… आजही करत आहे आणि उद्याही करणार आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने सामाजिक बांधिलकीने नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात…जनावरांच्या छावण्यात पशुखाद्य असेल… पुरपरिस्थितीत अन्नधान्याचे वाटप असेल किंवा कोरोना काळात केलेले काम असेल. या ट्रस्टला अनेक दात्यांनी व स्वयंसेवी संस्थांनी मदत केल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.
अनेक घटकांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदतीचा हात – जयंत पाटील
कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यावर अनेक घटकांची आर्थिक कोंडी झाली त्यांना मदतीचा हात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राज्यातील लोककलावंत व नाटयसृष्टीतील बॅकस्टेजला काम करणाऱ्या कलाकारांना रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली तर कोरोना योध्दा, आशा वर्कर्स यांना फेशशिल्ड दिले. राज्यातील लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले. निकड व गरज असलेल्या लोककलावंतांचा शोध माजी आमदार लक्ष्मण माने यांनी घेतले. रंगभूमीवर बॅकस्टेजला काम करणाऱ्या जवळपास दीड हजार कामगारांपैकी १२५० कामगारांना प्रत्येकी अडीच हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहेत. ६० हजार आशा वर्कर्सना फेशशिल्ड वाटप करण्यात आली. याशिवाय चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्हयात ५० लाख किमतीचे ५ हजार घरांचे लोखंडी पत्रे व दीड हजार ढापे देण्यात आले असल्याचेही त्यांनी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे पत्रा भेट देण्यात आला.

Check Also

सा.बां.विभागाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांच्या टोलमध्ये वाढ हलक्या वाहनांवरील सूट कायमच-मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *