Breaking News

आपतकालीन परिस्थितीतही रेशनिंग दुकानदारांकडून काळाबाजार गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई- नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून गैरप्रकार करणाऱ्या २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.
मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या ए पी एल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरीता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण ४४ दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
1) एकूण १३ शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
2) एकूण ४ शिधावटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
3) एकूण १२ शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
4) प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकामार्फत ३ ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अ) ४ एप्रिल २०२० अधिकृत शिधावाटप दुकान क्र.41-फ-218 येथे 1200 कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ३०,०७२/-, गुन्हा नोंद क्र.233/2020, नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे.
ब) ६ जून २०२० रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.33-ई-143 येथे टेम्पो क्र.एम.एच.-03-सी.पी.-3397, तांदूळ 2783 कि.ग्रॅ. व गहू 446 कि.ग्रॅ. अतिरिक्त, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ४,६१,४२०/-, गुन्हा नोंद क्र.167/2020, टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.
क) दिनांक ९ जून २०२० रोजी तुर्भे येथे पेट्रोल / डिझेल टँकर क्र.एम.एच.-06-बी.डी.-3777 मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी जप्त मुद्देमालाची किंमत रुपये ३३,१५,६९२/-, गुन्हा नोंद क्र.203/2020, तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *