Breaking News

नवे पालिका आयुक्त चहल, परदेशी पालिकेतून आऊट तर भिडे, जयस्वाल इन मदत व पुर्नवसनच्या निंबाळकरांना बांधकाम

मुंबई: प्रतिनिधी
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव नियुक्त करण्यात आले. तर त्यांच्या ठिकाणी नगरविकास विभागाचे सचिव आणि जलसंपदा विभागाचा अतिरिक्त भार असलेले इत्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच मदत व पुर्नवसनचे प्रमुख किशोरराजे निंबाळकर यांच्याकडील या विभागाचा भार काढत त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार राज्य सरकारने दिला.
मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना कोणतीही पोस्टींग देण्यात आली नव्हती. आता त्यांची नियुक्ती मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. तर तेथील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हड यांची मदत व पुर्नवसन विभागाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज सौनिक यांच्याकडे वित्त विभागाचा पूर्ण पदभार देण्यात आलेला आहे. तर मुंबई मेट्रोच्या अश्विनी भिडे यांना पुन्हा मुंबई महापालिचेच्या सेवेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तेथील जयश्री बोस यांची राज्याच्या लघु व मध्यम उद्योग विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *