Breaking News

मालकानों, भाडेकरूंना घरभाड्याचा तगादा लावू नका राज्य सरकारची सर्व घरमालकांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद स्वरूपात आहेत. त्यामुळे भाड्याने रहात असलेल्या अनेकांना घरभाडे देणे अशक्य होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही भाडेकरूच्या पाठी घरभाड्यासाठी घरमालकांनी तगादा लावू नये असे आवाहन राज्य सरकारने केले असून घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी अशी सूचनाही केली.
लॉक़डाऊनमुळे सर्वच संस्था, बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने यासह सर्वच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे रोजगारावर परिणाम झालेला आहे. तर अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. त्यामुळे घरमालकांनी या काळात त्यांच्यामागे घरभाड्यासाठी तगादा लावू नये असे आवाहन करत किमान तीन महिने घरभाडे वसूली पुढे ढकलावी असे आवाहन घरमालकांना करण्यात आले आहे. तसेच घरभाडे थकले म्हणून कोणाला घरातून बाहेरही काढू नये अशी सूचनाही करण्यात आली असून गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात पत्रकही जारी केले आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *