Breaking News

लोककलावंताना राष्ट्रवादीकडून मदतीचा हात भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या खात्यात जमा होणार ३ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा दुर्लक्षित आणि हातावर पोट असणारे असोत यामध्ये सर्वात दुर्लक्षित घटक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंत आहेत. आता त्यांच्या सगळ्या बार्‍या बंद झाल्या आहेत. यावर्षी कुठेही त्यांना काम मिळणार नाही. या सगळ्याची नोंद भटक्या विमुक्त जातीचे नेते लक्ष्मण माने हे करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोककलावंतांची ही व्यथा लक्ष्मण माने यांनी मांडली होती. त्यानुसार तात्काळ या दुर्लक्षित लोककलावंतांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आता राज्यातील वेगवेगळ्या भागात फडामध्ये व अन्य ठिकाणी राहणाऱ्या भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांची यादी, गाव आणि बॅंक खाते यांची नोंदही घेण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास ५ हजार भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांची नोंद झाली असून त्यांच्या बॅंक खात्यात उद्यापासून पहिला टप्पा म्हणून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *