Breaking News

१३९ जणांचा मृत्यू, एकूण संख्या ८० हजारापार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० टक्क्यावर मुंबईत २५ हजारावर, २४ तासात १४७५ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्येत एका बाजूला घट होताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रूग्ण्यांच्या संख्येत म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण आणि मृत पावणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्याची ८० हजारापार गेली तर आज तब्बल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आज ४२ हजार २१५ वर पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येने २५ हजार ७६८ वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे. राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४६०८० १८७७८ १५१९ २५७६८
ठाणे ११८७७ ४४४५ २९२ ७१४०
पालघर १२८५ ४६८ ३७ ७८०
रायगड १३६२ ७०४ ५५ ६०१
नाशिक १३६७ ९७८ ८१ ३०८
अहमदनगर १८८ ७६ १०४
धुळे १९५ १०२ २१ ७२
जळगाव ८९६ ३७४ १०९ ४१३
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४० २८
१० पुणे ९०५१ ४८९३ ३९० ३७६८
११ सोलापूर १२१७ ५७२ ९४ ५५१
१२ सातारा ५८७ २५० २२ ३१५
१३ कोल्हापूर ६३० ३०३ ३२१
१४ सांगली १३६ ७९ ५३
१५ सिंधुदुर्ग १०५ १७ ८८
१६ रत्नागिरी ३४४ १२९ १० २०५
१७ औरंगाबाद १७८१ ११४८ ९० ५४३
१८ जालना १७० ७८ ८९
१९ हिंगोली २०५ १४६ ५९
२० परभणी ७७ ४५ २९
२१ लातूर १३२ ८३ ४५
२२ उस्मानाबाद १०६ ५३ ५०
२३ बीड ५१ ३८ १२
२४ नांदेड १६२ १०२ ५३
२५ अकोला ७२७ ४०५ ३३ २८८
२६ अमरावती २७५ १६४ १६ ९५
२७ यवतमाळ १६० १०४ ५४
२८ बुलढाणा ८२ ४८ ३१
२९ वाशिम
३० नागपूर ६८१ ४११ ११ २५९
३१ वर्धा
३२ भंडारा ३८ १४ २४
३३ गोंदिया ६८ ५० १८
३४ चंद्रपूर ३० २५
३५ गडचिरोली ४१ २५ १६
  इतर राज्ये /देश ६५ १८ ४७
  एकूण ८०२२९ ३५१५६ २८४९ ४२२१५

 

आज नोंद झालेल्या मृतकांची संख्या –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ९३ मुंबई -५४, ठाणे – ३०, वसई विरार -१,कल्याण डोंबवली -७, भिवंडी -१
नाशिक २४ जळगाव -१४, नाशिक -२, मालेगाव – ८
पुणे १६ पुणे  -१४, सोलापूर -२
कोल्हापूर रत्नागिरी -५
औरंगाबाद औरंगाबाद  १

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *