Breaking News

सोलापूरात ४१ जणांना घरी सोडले मात्र नव्याने ४८ जणांची भर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी
जिल्ह्यातील ४१ कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी गेल्याने एकप्रकारचे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दुसऱ्याबाजूला ४८ नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचल्याची माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली.
रविवारी १३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८४ जणांचे अहवाल नकारात्मक तर ४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. प्रलंबित अहवाल १५२ असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय नगर(midc)१, गजानन नगर,जुळे सोलापूर १, शास्त्री नगर ७, सदर बझार ४, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड १, बुधवार पेठ मिलिंद नगर १, बजरंग नगर, होटगी रोड १, सिव्हिल कॉर्टर १, सम्राट चौक आंबेडकर उद्यान जवळ १, मंत्री चंडक- पोलीस कॉलनी सम्राट चौक १, रविवार पेठ १, पोलीस वसाहत मुरारजी पेठ १, समृद्धी हेरिटेज जुळे सोलापूर १, निर्मिती टॉवर मोदी खाना १, अश्विनी हॉ. कुंभार ग्रामीण १, सिध्देश्वर पेठ ८, लोकसेवा शाळेजवळ १, तेलंगी पाच्छा पेठ १, तुळशांती नगर विडी घरकुल १, हुडको कॉलनी कुमठा नाका २, मोदी खाना २, कुंभारी नाका १, कुमारस्वामी नगर १, सिद्धार्थ चौक १, नीलम नगर १, मुलींचे वसतीगृह होटगी नाका १, सहारा नगर,मजरेवाडी १, शिवाजी नगर मोदी १, पाटकुळ(मोहोळ) १, धाक बाबूळगांव(मोहोळ)१, सावळेशवर(मोहोळ) १ आदी ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *