Breaking News

सायबर भामट्यांच्या “या” ऑनलाईन युक्त्यापासूनपासून सावध महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना आवाहन- विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या आताच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत.
१) कोविड १९ :
या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल अथवा मेसेज येतो की, तुम्ही जर Amazon Gift Coupon खरेदी केलेत तर त्याची रक्कम कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरली जाईल. अशा आशयाचा मजकूर व एक लिंक दिली असते. ही लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
२) Job Offer Scam :
या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल किंवा मेसेज येतो की, तुम्ही सध्याच्या काळात घर बसल्या काम करुन पैसे मिळवु शकतात व एक लिंक दिली असते. ही लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
३) ऑनलाईन खरेदी Scam :
बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन सायबर भामटे एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके,अन्य गृह उपयोगी वस्तू, किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत अशी जाहिरात करतात. ही लिंक Amazon.com किंवा अन्य e-portal सारखी दिसायला पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
४) Boss Scam:
कधी कधी तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने एखादा ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यासाठी Amazon gift card खरेदी केले आहे, तर सोबतच्या लिंकवर क्लिक करुन ते redeem करा. ही लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.
५) टँक्स Scam:
यामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो की, तुम्ही काही कर (Tax) भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ही लिंक सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते, पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,
१) जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.
२) सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवु शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.
३) ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावाच्या पेक्षा खुप स्वस्त विकत असेल, तर सतर्क व्हा.
४) इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.
५) जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी gift card coupon भेट दिली आहे असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.
जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Check Also

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *