Breaking News

आज पुन्हा थोडीशी संख्या वाढली राज्यात ८ हजार ५९० वर पोहोचले रूग्ण तर मुंबईत ५ हजार ७७६

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल रविवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली असून मागील २४ तासात ५२२ रूग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील रूग्णांची संख्या आज ५ हजार ७७६ वर पोहोचली असून तब्बल २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत १२८२ रूग्ण बरे होवून घरे गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कालपर्यंत १९, २० आणि २२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू पावल्याची आकडेवारी पुढे येत होती. मात्र आज तब्बल २७ रूग्णाचा मृत्यू झाला असून ही आकडेवारी चिंताजनक आहे. यामध्ये मुंबईतील १५ मृतकांचा समावेश आहे. अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,२१,५६२ नमुन्यांपैकी १,१२,५५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
नांदेड शहरात पीरबु-हान परिसरात जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोविड बाधित आढळल्यानंतर या रुग्णाच्या निकटसहवासितांचा कसून तपास घेण्यात आला असून या रुग्णाचे ८० संपर्कातील लोकांची प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. या परिसरात १३ हजार लोकसंख्येचे ४० सर्वेक्षण पथकांद्वारे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरम्यान आज शहरात गुरुद्वारा परिसरात आणखी एका बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ५७७६ २१९
ठाणे ४०
ठाणे मनपा २९५
नवी मुंबई मनपा १३५
कल्याण डोंबवली मनपा १४५
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा १४
मीरा भाईंदर मनपा १२१
पालघर २५
१० वसई विरार मनपा १२१
११ रायगड १८
१२ पनवेल मनपा ४३
  ठाणे मंडळ एकूण ६७३५ २३८
१३ नाशिक
१४ नाशिक मनपा १९
१५ मालेगाव मनपा १२३ १२
१६ अहमदनगर २६
१७ अहमदनगर मनपा १६
१८ धुळे
१९ धुळे मनपा १७
२० जळगाव १८
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार ११
  नाशिक मंडळ एकूण २४४ २३
२३ पुणे ५८
२४ पुणे मनपा ९६९ ७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ५९
२८ सातारा २९
  पुणे मंडळ एकूण ११९३ ८७
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी
  कोल्हापूर मंडळ एकूण ४७
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ५१
३७ जालना
३८ हिंगोली
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ६३
४१ लातूर १०
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १७
४७ अकोला ११
४८ अकोला मनपा १८
४९ अमरावती
५० अमरावती मनपा २१
५१ यवतमाळ ६२
५२ बुलढाणा २१
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण १३५
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १२३
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण १३१
  इतर राज्ये २५
  एकूण ८५९० ३६९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *