Breaking News

रानावनातच उपाशी राहायची वेळ आलीय, मुख्यमंत्री साहेब मदत करा यशवंत सेनेची उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे साद

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या विविध भागात शेळ्या-मेढ्यांना जगविण्यासाठी मेंढपाळ-धनगर एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. मात्र आता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आम्हा मेंढपाळ-धनगरांना गावात प्रवेश नाकारण्यात येत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून याकालावधीत आपण आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवित केली.

गावांमध्ये प्रवेश देण्यात येत नसल्याने अन्न-धान्याची खरेदी करता येत नाही. त्यामुळे रानावनातच उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यातच सोबत मेंढ्या असल्याने सरकारी शेल्टर होम मध्येही राहता येत नसल्याने आपणच यातून काही तरी मार्ग काढून मदत करावी अशी विनंतीही त्यांनी केली.

 

प्रति,

 

मा. श्री.उद्धवजी ठाकरे

मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य.

 

विषय- कोरोनाच्या या साथीत मेंढपाळ-धनगर समाजाला मदत करण्यासंदर्भात.

 

आदरणीय उद्धवजी,

 

जय महाराष्ट्र… जय मल्हार…

 

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सांगू इच्छितो की राज्यात सुमारे दीड लाख मेंढपाळांचे कळप आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावात शिरू दिलं जात नाहीये. मेंढपाळ गावाबाहेर रानावनात राहत असले तरी अन्न – धान्यावाचून उपासमारीची वेळ आलीय. सोबत मेंढ्या असल्यामुळे सरकारी शेल्टर होम्स मध्येही राहण्याची व्यवस्था नाही.

कोरोनाच्या या महामारीच्या साथीमध्ये आपण ज्या पद्धतीने काम करत आहात, सर्वांना धीर देत आहात सगळ्या यंत्रणांवर लक्ष ठेवून त्यांना सातत्याने कार्यरत ठेवत आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आपला आम्हाला खरच आधार वाटतोय. त्यामुळे या महामारीच्या साथीत आमच्या भटक्या मेंढपाळ समाजाकडे लक्ष देऊन तातडीने मदत आणि उपाययोजना करावी ही आपणास नम्र विनंती.

 

धन्यवाद

 

आपला,

राजू झंजे

प्रमुख

महाराष्ट्र यशवंत सेना.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *