Breaking News

आयएएस, आयपीएस, राजपत्रित अ-बचे दोन तर क-ड चा एक दिवसाचा पगार कोविडसाठी हरकत असतील त्यांनी तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अ-ब वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचे वेतन तर क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कोविड विरोधी लढ्यासाठी वेतनातून कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या वेतन कपातीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तातडीने तसेच संबधित विभागाच्या प्रमुखास कळवावे अशी सूचनाही राज्य सरकारने केली. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होणार आहे.
या अधिकाऱ्यांबरोबरच सर्व मंत्रालयीन विभागातील आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकिय -निमशासकिय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे, सर्व स्वायत्त संस्थेचे प्रमुख, कार्यालयय प्रमुखांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. तसेच हे दोन दिवसाचे वेतन मे महिन्यातील राहणार असल्याने प्रत्येक कार्यालयाने दोन दिवसाचे वेतन कपात करूनच तशी वेतन बिले तयार करावीत असे आदेशही सर्वांना बजाविण्यात आले.

Check Also

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *