Breaking News

हिंदुस्थान युनिलिव्हरने दिली १० कोटीहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

मुंबई: प्रतिनिधी
हिंदुस्थान युनी लिव्हर लि. कंपनीने गेल्या सप्ताहात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला मिळून १० कोटी रुपयांहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली. यामध्ये ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटसचा समावेश आहे तर आणखी ५ कोटी रुपये किंमतीची विविध वैद्यकीय संसाधनेही त्यांनी उपलब्ध करून दिली. यामध्ये व्हेंटेलेटर्स, पीपीई किटस (वैयक्तिक संरक्षण साधने), मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सीजन सकेंद्रक (oxygen concentrators) याचा समावेश आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बिझिनेस अँड कम्युनिकेशन हेड प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली. याव्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना ही स्वछता आणि आरोग्यविषयक साधने मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले.
कोविड विषाणू विरोधात लढतांना आतापर्यंत राज्यातील जनतेने जसे शासनाला भरभरून सहकार्य केले. तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. सहकार्यांच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणूविरोधात लढताना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून हिंदुस्थान युनिलिव्हर लि. ला मनापासून धन्यवाद दिले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *