Breaking News

रेडझोनमधील योध्दा कोरोनावर मात करून परतला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी केली कोरोनावर मात

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य जनतेसह मंत्री माजी मंत्रीही त्रस्त झाले असतानाच राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नुकतेच या संकटावर यशस्वीरित्या मात करून बाहेर आले असून रेड झोनमध्ये असलेल्या या नेत्याच्या परतीचे चेंबरमध्ये काल उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रात व विशेषतःदाटीवाटीचा भाग असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावी आणि चेंबूर मधील पी. एल. लोखंडे मार्ग हा परिसर कोरोनाचा रेड झोन हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्ण संख्या असलेल्या या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व इतर सुविधा देण्यासाठी चेंबूरचे माजी आमदार व आपल्या कार्यकाळात प्रत्येक जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाची संकल्पना मांडणारे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे सतत लोकांमध्ये वावरत होते. कोरोनाच्या महामारीतही जनतेमध्ये जाऊन काम करीत असल्याने या संसर्गाची लागण मंत्री जितेंद्र आव्हाड व अशोक चव्हाण यांना झाली. त्याच पध्दतीने हंडोरे यांना देखील झाली. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्याने हंडोरे यांच्या कुटुंबियांनी त्यांना १२ मे रोजी त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल केले आव्हाड व चव्हाण या मंत्र्यांप्रमाणे हंडोरे यांनादेखील कोरोना झाल्याची बातमी पसरताच हंडोरे यांच्या राज्यभरातील हितचिंतक व मित्र परीवारात खळबळ उडाली होती. परंतु आपण लोक कुणीही चिंता करू नये ही लढाई आपण योध्द्याप्रमाणे जिंकून बाहेर जनतेत येऊ अशी ग्वाही हंडोरे यांनी आपल्या सर्व चाहत्यांना दिली होती.
दरम्यान ६ दिवस अतिदक्षता व १२ दिवस दक्षता विभागात राहिलेल्या हंडोरे यांचे पहीले तीन तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले. चिंता वाढविणारे हे अहवाल आल्यानंतरदेखील हंडोरे हे न डगमगता फोनद्वारे आपल्या मतदार संघातील जनतेची काळजी वाहत होते. अखेर त्यांचा चौथा अहवाल काल निगेटीव्ह आला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
हंडोरे यांचा चौथा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर काल रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या चेंबूर पी एल लोखंडे मार्ग येथील घरी परतलेल्या हंडोरे यांचे स्थानिक जनतेने फटाक्यांचा आतिशबाजी ढोलताशे वाजवून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कोरोनासारख्या महामारीपासून बचाव करायचा असेल तर जनतेने घरीच रहावे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी विनाकारण बाहेर पडून रोगास आमंत्रण देण्याचे धाडस कुणीही दाखवू नये असे आवाहन हंडोरे यांनी यावेळी बोलताना केले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *