Breaking News

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येची पुन्हा लाखाकडे वाटचाल ५ हजार ५४४ नवे बाधित, ४ हजार ३६२ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दररोज ७० ते ८० हजार तपासण्या होत असल्या तरी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र ही संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी दररोज आढळून येणाऱ्या संख्येने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णसंख्येने पुन्हा एकदा एक लाख संख्येकडे वाटचाल सुरु केली आहे.

मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४४ नवे बाधित आढळून आले असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ९० हजार ९९७ वर तर एकूण रूग्णसंख्या १८ लाख २० हजार ५९ इतकी झाली आहे. तर काल ७५ इतकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज १० ने वाढ होत ८५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ४,३६२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,८०,९२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.३६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,०४,४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२०,०५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२६,५५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९४० २८२८२१ १८ १०८६५
ठाणे ८४ ३६६६० ९१७
ठाणे मनपा १६१ ५१०८७ ११५४
नवी मुंबई मनपा १८० ५१७७० १००८
कल्याण डोंबवली मनपा १८० ५७९८६ ९३४
उल्हासनगर मनपा ३९ १०९२७ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ६६५१ ३३८
मीरा भाईंदर मनपा ६८ २५२४२ ६२६
पालघर ३१ १६०७३ ३१७
१० वसईविरार मनपा ६७ २९०८१ ५६०
११ रायगड ६१ ३६२८३ ९०६
१२ पनवेल मनपा ५१ २६८१६ ५३८
  ठाणे मंडळ एकूण १८७५ ६३१३९७ २६ १८४९६
१३ नाशिक १२१ ३१११० ६३३
१४ नाशिक मनपा २५२ ६९२५१ ९२५
१५ मालेगाव मनपा ४३३३ १५१
१६ अहमदनगर २५२ ४३४२४ ५७२
१७ अहमदनगर मनपा २१ १९५७३ ३६१
१८ धुळे १२ ७९८३ १८४
१९ धुळे मनपा ६७३४ १५२
२० जळगाव ३६ ४२२३४ ११०२
२१ जळगाव मनपा २८ १२७८१ २९८
२२ नंदूरबार ६९९५ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७३८ २४४४१८ ४५२९
२३ पुणे २३७ ८३५३४ १९४९
२४ पुणे मनपा ३६२ १८०२९९ १९ ४२३०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८२ ८८७३२ १२६४
२६ सोलापूर १५५ ३८५५९ १०९३
२७ सोलापूर मनपा ३९ ११२१५ ५६३
२८ सातारा १५१ ५२४२१ १६६६
  पुणे मंडळ एकूण ११२६ ४५४७६० ३२ १०७६५
२९ कोल्हापूर १५ ३४५४४ १२४१
३० कोल्हापूर मनपा १३९४५ ४०४
३१ सांगली ३३ २९१०९ ११०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५०५ ६०८
३३ सिंधुदुर्ग १५ ५४०४ १४९
३४ रत्नागिरी ६१ १०८७१ ३६७
  कोल्हापूर मंडळ एकूण १४० ११३३७८ ३८७१
३५ औरंगाबाद १४ १५२६४ २८१
३६ औरंगाबाद मनपा ११९ २९८४६ ७७९
३७ जालना ३३ ११७१८ ३१०
३८ हिंगोली ३७ ३९४३ ७५
३९ परभणी ३९७६ १३८
४० परभणी मनपा १३ ३१२१ ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २२३ ६७८६८ १७००
४१ लातूर २७ १३१४४ ४४१
४२ लातूर मनपा ३५ ९०८६ २१०
४३ उस्मानाबाद ४७ १६३३९ ५१९
४४ बीड ५० १६१५४ ४८६
४५ नांदेड ४३ १०६९७ ३४३
४६ नांदेड मनपा ५२ ९६१८ २६६
  लातूर मंडळ एकूण २५४ ७५०३८ २२६५
४७ अकोला ४१४० १२८
४८ अकोला मनपा ४० ५३२९ २२१
४९ अमरावती १६ ६८०१ १५५
५० अमरावती मनपा २७ ११६५२ १९७
५१ यवतमाळ ७२ १२११६ ३४९
५२ बुलढाणा १८ ११९७० २०५
५३ वाशिम ६०७२ १४८
  अकोला मंडळ एकूण १८६ ५८०८० १४०३
५४ नागपूर ४५ २६५२१ ६०२
५५ नागपूर मनपा ३६३ ८७१२३ २३७८
५६ वर्धा ५६ ८२०४ २१७
५७ भंडारा १२१ १११६५ २२४
५८ गोंदिया १०८ १२४५६ १२८
५९ चंद्रपूर १४९ १२३९८ १७५
६० चंद्रपूर मनपा ६६ ७७३४ १३९
६१ गडचिरोली ७३ ७४२६ ६१
  नागपूर एकूण ९८१ १७३०२७ ३९२४
  इतर राज्ये /देश २१ २०९३ ११८
  एकूण ५५४४ १८२००५९ ८५ ४७०७१

आज नोंद झालेल्या एकूण ८५ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २१ मृत्यू हे पुणे -८, औरंगाबाद -३, यवतमाळ -३, जळगाव २, नागपूर -२,लातूर -१ , नांदेड -१ आणि पालघर – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे  –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८२८२१ २५५५४० १०८६५ ८०६ १५६१०
ठाणे २४०३२३ २१८६१७ ५३१० ५८ १६३३८
पालघर ४५१५४ ४३५७९ ८७७ १५ ६८३
रायगड ६३०९९ ५८१४५ १४४४ ३५०३
रत्नागिरी १०८७१ ९८८३ ३६७ ६२०
सिंधुदुर्ग ५४०४ ४९६० १४९ २९४
पुणे ३५२५६५ ३२५४३० ७४४३ ३४ १९६५८
सातारा ५२४२१ ४८३७५ १६६६ १० २३७०
सांगली ४८६१४ ४५९१७ १७१० ९८५
१० कोल्हापूर ४८४८९ ४६५८१ १६४५ २६०
११ सोलापूर ४९७७४ ४५७२३ १६५६ १० २३८५
१२ नाशिक १०४६९४ १०१०७७ १७०९ १९०७
१३ अहमदनगर ६२९९७ ५७९६१ ९३३ ४१०२
१४ जळगाव ५५०१५ ५२३६५ १४०० १९ १२३१
१५ नंदूरबार ६९९५ ६३८१ १५१ ४६२
१६ धुळे १४७१७ १४२१५ ३३६ १६३
१७ औरंगाबाद ४५११० ४२८७४ १०६० १४ ११६२
१८ जालना ११७१८ १११२७ ३१० २८०
१९ बीड १६१५४ १४६८६ ४८६ ९७५
२० लातूर २२२३० २०४६४ ६५१ १११२
२१ परभणी ७०९७ ६५१९ २५५ ११ ३१२
२२ हिंगोली ३९४३ ३६४६ ७५   २२२
२३ नांदेड २०३१५ १९०५० ६०९ ६५१
२४ उस्मानाबाद १६३३९ १४६०४ ५१९ १२१५
२५ अमरावती १८४५३ १७०७९ ३५२ १०२०
२६ अकोला ९४६९ ८५६२ ३४९ ५५३
२७ वाशिम ६०७२ ५८४४ १४८ ७८
२८ बुलढाणा ११९७० १०९२५ २०५ ८३५
२९ यवतमाळ १२११६ ११२४९ ३४९ ५१४
३० नागपूर ११३६४४ १०६५१७ २९८० १५ ४१३२
३१ वर्धा ८२०४ ७२४६ २१७ ७३७
३२ भंडारा १११६५ ९७१० २२४ १२३०
३३ गोंदिया १२४५६ ११२३७ १२८ १०८५
३४ चंद्रपूर २०१३२ १७७३८ ३१४ २०७९
३५ गडचिरोली ७४२६ ६६७२ ६१ ६८८
  इतर राज्ये/ देश २०९३ ४२८ ११८ १५४६
  एकूण १८२००५९ १६८०९२६ ४७०७१ १०६५ ९०९९७

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *