Breaking News

कोरोना: मुंबईत दुपटीने तर राज्यात १ हजाराहून अधिकची रूग्णवाढ ४ हजार ७८७ नवे बाधित, ३ हजार ८५३ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल ४३१ बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात दुपटीने वाढ होत ही संख्या ७२१ इतके बाधित आढळले. तर राज्यात ३ हजार ३६३ इतकी असलेल्या संख्येत आज १ हजाराने वाढ होत ४ हजार ७८७ इतके रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३८ हजार ०१३ वर पोहोचली आहे. मुंबईबरोबरच पुणे, नाशिक, अकोला आणि नागपूर मंडळात कालच्यापेक्षा जवळपास दुपटीने रूग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात ३,८५३ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६२% एवढे झाले आहे. दिवसभरात राज्यात ४,७८७  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५४,५५,२६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७६,०९३ (१३.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९५,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७२१ ३१५७५१ ११४२८
ठाणे ४६ ४२०२१ ९९४
ठाणे मनपा ११३ ६०९३३ १२५३
नवी मुंबई मनपा ९१ ५८४४४ १११८
कल्याण डोंबवली मनपा १३१ ६५४२६ १०४५
उल्हासनगर मनपा ११७६७ ३४८
भिवंडी निजामपूर मनपा ६९०० ३४१
मीरा भाईंदर मनपा ३१ २८२४० ६६६
पालघर ११ १७०६४ ३२१
१० वसईविरार मनपा ३० ३१३७४ ६१८
११ रायगड १८ ३७९३१ ९९०
१२ पनवेल मनपा ४३ ३१६८९ ६०२
ठाणे मंडळ एकूण १२३७ ७०७५४० १२ १९७२४
१३ नाशिक ५२ ३७९२२ ७९६
१४ नाशिक मनपा १५९ ८१५४९ १०६६
१५ मालेगाव मनपा ४८३७ १६४
१६ अहमदनगर ८५ ४७१६५ ७११
१७ अहमदनगर मनपा ३० २६२६५ ४०३
१८ धुळे ८८३५ १८७
१९ धुळे मनपा १८ ७५३८ १५०
२० जळगाव ४६ ४४९७१ ११६४
२१ जळगाव मनपा ३१ १३२७७ ३२८
२२ नंदूरबार २२ १००२३ २१५
नाशिक मंडळ एकूण ४४९ २८२३८२ ५१८४
२३ पुणे १९८ ९५२४४ २१४०
२४ पुणे मनपा ४४३ २०२३५० ४५५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२३ ९८९७७ १३२१
२६ सोलापूर ३९ ४३६४७ १२१२
२७ सोलापूर मनपा २४ १३३१४ ६२०
२८ सातारा ८६ ५७६३९ १८३३
पुणे मंडळ एकूण १०१३ ५१११७१ ११६८३
२९ कोल्हापूर ३४७१९ १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६८१ ४१७
३१ सांगली ३३०६४ ११६१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०४० ६२८
३३ सिंधुदुर्ग ६५४९ १७७
३४ रत्नागिरी ३० ११८३७ ४०९
कोल्हापूर मंडळ एकूण ६८ ११८८९० ४०४९
३५ औरंगाबाद ११ १५७१५ ३२७
३६ औरंगाबाद मनपा ९३ ३४५५६ ९२६
३७ जालना ९६ १३८४६ ३६७
३८ हिंगोली ४४९८ १००
३९ परभणी ४५४४ १६४
४० परभणी मनपा १४ ३५७८ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण २१८ ७६७३७ २०१६
४१ लातूर १२ २१७२७ ४६६
४२ लातूर मनपा १९ ३२८४ २२६
४३ उस्मानाबाद १९ १७७५१ ५५७
४४ बीड २८ १८५८६ ५५७
४५ नांदेड १२ ९०४४ ३८३
४६ नांदेड मनपा १३६०८ २९५
लातूर मंडळ एकूण ९९ ८४००० २४८४
४७ अकोला ८४ ४८७० १३५
४८ अकोला मनपा १०५ ८०६२ २३७
४९ अमरावती २३० ९२७८ १८५
५० अमरावती मनपा ३९५ १७८६३ २३४
५१ यवतमाळ ८२ १६५५१ ४६५
५२ बुलढाणा १०२ १६००८ २५४
५३ वाशिम ४३ ७६१४ १६१
अकोला मंडळ एकूण १०४१ ८०२४६ १६७१
५४ नागपूर ५९ १६५७० ७६५
५५ नागपूर मनपा ४५३ १२५३१७ २६७४
५६ वर्धा ९१ ११६२४ ३०१
५७ भंडारा १८ १३७०८ ३१३
५८ गोंदिया १४४६१ १७३
५९ चंद्रपूर १२ १५१५२ २४६
६० चंद्रपूर मनपा १२ ९२३९ १६४
६१ गडचिरोली १० ८९१० ९९
नागपूर एकूण ६६२ २१४९८१ ४७३५
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ४७८७ २०७६०९३ ४० ५१६३१

आज नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू ठाणे -६,  नाशिक -२, रत्नागिरी -२, लातूर -१ आणि यवतमाळ – १ असे आहेत.

 

Check Also

राज्यात २१ जिल्ह्यांमध्ये वाढ असली तरी बाधितांमध्ये ५ टक्क्यांची घट १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *