Breaking News

कोरोना: बाधितांच्या संख्येत एकदम १० हजार २१८ ची एकदम घट ४ हजार ३०४ नवे बाधित, ४ हजार ६७८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या बदलानुसार दुहेरी नोंद वगळणे आणि इतर राज्यांमधील पॉझिटिव्ह व्यक्ती त्या त्या राज्यात वर्ग करणे, यामुळे एकूण बाधितांच्या संख्येत १०,२१८ रुग्णांची घट झाली आहे. त्या सोबतच राज्यातील बाधित व्यक्तींच्या पत्त्यातील बदलामुळे जिल्हे व मनपा यांच्या बरे झालेल्या आणि ॲक्टिव्ह रुग्ण संख्येमध्ये बदल झाले आहेत आणि यामुळे राज्याच्या एकूण बरे झालेल्या रुग्णांमध्ये ७९१ ने घट झाली आहे. काल मंगळवार पर्यत हीच संख्या ७१ हजाराच्या घरात होती. त्यात आज घट झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६० हजारावर आली.

राज्यातील बाधित आणि बरे होणाऱ्यांची संख्या जवळपास सारखीच असून नवे बाधित ४ हजार ३०४ आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ८० हजार ८९३ वर पोहोचली आहे. तर ४ हजार ६७८ रूग्ण बरे झाले असून घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख ६९ हजार ८९७ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६१,४५४ इतकी झाली आहे. तर ९५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५८% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१८,७१,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८०,८९३ (१५.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०९,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७९५ २८४४०४ १२ ११००३
ठाणे ६९ ३८६७४ ९३३
ठाणे मनपा १०० ५४६३७ ११७६
नवी मुंबई मनपा ११५ ५२११५ १०४१
कल्याण डोंबवली मनपा ११९ ५९१९५ ९५५
उल्हासनगर मनपा १९ १११७० ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६५७३ ३४२
मीरा भाईंदर मनपा ३५ २६२५७ ६३४
पालघर २२ १६१७७ ३१४
१० वसई विरार मनपा ४९ २९९५६ ५८२
११ रायगड ३८ ३६३७१ ९१२
१२ पनवेल मनपा ४२ २८९१० ५४६
  ठाणे मंडळ एकूण १४०८ ६४४४३९ २० १८७७१
१३ नाशिक ६७ ३३६८१ ६८०
१४ नाशिक मनपा २०६ ७३११० ९६४
१५ मालेगाव मनपा ४४८७ १५६
१६ अहमदनगर १४७ ४२३२६ ६२५
१७ अहमदनगर मनपा ६२ २४६३० ३७४
१८ धुळे २२ ८३८५ १८६
१९ धुळे मनपा ६९४५ १५४
२० जळगाव १७ ४३२५४ ११२१
२१ जळगाव मनपा १५ १२१४४ ३०१
२२ नंदूरबार ५९ ७५८३ १६५
  नाशिक मंडळ एकूण ६०६ २५६५४५ १९ ४७२६
२३ पुणे २२० ८५६४६ २०२४
२४ पुणे मनपा ३०७ १८६९५१ ४३६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३३ ९१७७९ १२५९
२६ सोलापूर ११२ ४०३८३ ११४७
२७ सोलापूर मनपा ३३ ११५०१ ५७१
२८ सातारा १०० ५३५५० १७३५
  पुणे मंडळ एकूण ९०५ ४६९८१० २० १११०२
२९ कोल्हापूर १७ ३४६८० १२५०
३० कोल्हापूर मनपा १४२५० ४०७
३१ सांगली १५ ३२११४ ११२९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७६८५ ६१४
३३ सिंधुदुर्ग ४६ ५८२४ १५४
३४ रत्नागिरी १८ १०९७३ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ११० ११५५२६ ३९२५
३५ औरंगाबाद ३५ १४९७७ २८९
३६ औरंगाबाद मनपा ५७ ३१७२० ८२२
३७ जालना ३६ १२४५२ ३३०
३८ हिंगोली ४१०३ ९०
३९ परभणी ४२३८ १५२
४० परभणी मनपा ३१६५ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १४७ ७०६५५ १६ १८०५
४१ लातूर २१ २०४९७ ४५७
४२ लातूर मनपा २३ २२८१ २१६
४३ उस्मानाबाद २४ १६५८३ ५३२
४४ बीड ४० १६५४२ ५१४
४५ नांदेड २० ८३०९ ३५४
४६ नांदेड मनपा १९ १२५१५ २७६
  लातूर मंडळ एकूण १४७ ७६७२७ २३४९
४७ अकोला ३९३१ १२९
४८ अकोला मनपा ३८ ६०९९ २१२
४९ अमरावती ६९३९ १६२
५० अमरावती मनपा ४६ १२२०३ २०७
५१ यवतमाळ २६ १३०५३ ३८६
५२ बुलढाणा ८१ १२८९३ २०९
५३ वाशिम १८ ६६१७ १४९
  अकोला मंडळ एकूण २२२ ६१७३५ १४५४
५४ नागपूर ९२ १२८०६ ६५२
५५ नागपूर मनपा ३४८ १०६९५५ २४६५
५६ वर्धा ५२ ८८७८ २३३
५७ भंडारा ६४ १२०६२ २५१
५८ गोंदिया ३८ १३३१४ १४२
५९ चंद्रपूर ५८ १३९३५ २०४
६० चंद्रपूर मनपा ६२ ८४७९ १५५
६१ गडचिरोली ४५ ८१७२ ७३
  नागपूर एकूण ७५९ १८४६०१ १३ ४१७५
  इतर राज्ये /देश ८५५ १२७
  एकूण ४३०४ १८८०८९३ ९५ ४८४३४

आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २१ मृत्यू नागपूर -५, औरंगाबाद -५, सोलापूर -३, अहमदनगर -३, जळगाव -१, नाशिक -१, परभणी -१,रायगड -१ आणि वर्धा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८४४०४ २६५६०६ ११००३ ८३७ ६९५८
ठाणे २४८६२१ २३२११४ ५४१४ ५९ ११०३४
पालघर ४६१३३ ४४८५२ ८९६ १७ ३६८
रायगड ६५२८१ ६२५२२ १४५८ १२९४
रत्नागिरी १०९७३ १०११३ ३७१ ४८७
सिंधुदुर्ग ५८२४ ५२३४ १५४ ४३५
पुणे ३६४३७६ ३३९७३९ ७६४९ ३५ १६९५३
सातारा ५३५५० ५०६११ १७३५ १० ११९४
सांगली ४९७९९ ४७६४९ १७४३ ४०४
१० कोल्हापूर ४८९३० ४६४७५ १६५७ ७९५
११ सोलापूर ५१८८४ ४८९५९ १७१८ १३ ११९४
१२ नाशिक १११२७८ १०६४२९ १८०० ३०४८
१३ अहमदनगर ६६९५६ ६३४४८ ९९९ २५०८
१४ जळगाव ५५३९८ ५३४२३ १४२२ २० ५३३
१५ नंदूरबार ७५८३ ६९४९ १६५ ४६८
१६ धुळे १५३३० १४७३८ ३४० २४९
१७ औरंगाबाद ४६६९७ ४४७२८ ११११ १४ ८४४
१८ जालना १२४५२ ११८७६ ३३० २४५
१९ बीड १६५४२ १५६३८ ५१४ ३८३
२० लातूर २२७७८ २१६७४ ६७३ ४२७
२१ परभणी ७४०३ ६९४३ २७४ ११ १७५
२२ हिंगोली ४१०३ ३९२१ ९०   ९२
२३ नांदेड २०८२४ १९७४३ ६३० ४४६
२४ उस्मानाबाद १६५८३ १५५७७ ५३२ ४७३
२५ अमरावती १९१४२ १८२३४ ३६९ ५३७
२६ अकोला १००३० ९३२३ ३४१ ३६१
२७ वाशिम ६६१७ ६२२२ १४९ २४४
२८ बुलढाणा १२८९३ ११८८० २०९ ७९९
२९ यवतमाळ १३०५३ १२२०८ ३८६ ४५५
३० नागपूर ११९७६१ ११२१५० ३११७ १५ ४४७९
३१ वर्धा ८८७८ ८१९५ २३३ ४४६
३२ भंडारा १२०६२ १११३० २५१ ६८०
३३ गोंदिया १३३१४ १२७३५ १४२ ४३१
३४ चंद्रपूर २२४१४ २११२९ ३५९ ९२५
३५ गडचिरोली ८१७२ ७७३० ७३ ३६३
इतर राज्ये/ देश ८५५ १२७ ७२७
एकूण १८८०८९३ १७६९८९७ ४८४३४ ११०८ ६१४५४

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *