Breaking News

कोरोना: बाधितांची संख्या स्थिर तर घरी जाणारे वाढले ३ हजार ५२४ नवे बाधित, ४ हजार २७९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

काल ३१ डिसेंबर २०२० या वर्ष अखेरच्या दिवशी राज्यात जवळपास समसमान बाधित आणि घरी जाणाऱ्यांची संख्या होती. मात्र आज वर्षाच्या पहिल्या दिवशी ३ हजार ५२४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत १ हजाराने वाढ ४ हजार २७९ इतके बाधित बरे होवून घरी गेले असल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण १८,३२,८२५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% इतका राहीला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२८,२३,८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३५,६३६ (१५.०९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५२, ०८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात २,६९,३४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *